पुणे : 'जीविधा' या पर्यावरण संवर्धन आणि जनजागृतीच्या क्षेत्रात कार्यरत संस्थेच्या वतीने 'निर्मिती भारतभूमीची' हे प्रदर्शन दि.९ ते १२ जानेवारी २०२५ दरम्यान बालगंधर्व कलादालन(शिवाजीनगर) येथे आयोजित करण्यात आले आहे.या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यसभा खासदार डॉ.मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते ९ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. 'जीविधा' च्या वतीने अध्यक्ष राजीव पंडित यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
उंची,तपमान,पर्जन्यमान यात प्रचंड विविधता असणाऱ्या भारतभूमीच्या निर्मितीचा प्रवास भित्तीपत्रक स्वरूपात या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहे. याशिवाय महत्वाच्या भूवैज्ञानिक घटनांचे प्रारूपे (माॅडेल्स) व नकाशे ठेवण्यात येणार आहेत. यासोबत 'माय अर्थ मिनरल्स'यांच्यातर्फे भारतात आढळणारे खडक, खनिजे व फाॅसिल्स यांचा संग्रह याच प्रदर्शनात ठेवला जाणार आहे. प्रदर्शनाचा मुख्य हेतू भूविज्ञान, भूगोल यामुळे जैवविविधता निर्माण करणे आणि या तीनही बाबींची जपणूक करणे ,ही आपली जबाबदारी आहे ,याबाबत जनजागृती करणे, हा आहे.सकाळी ११ ते रात्री ८ या वेळात हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत खुले आहे.
भूविज्ञान,भूगोल आणि जैवविविधता बाबत योगदान देणाऱ्या डॉ.श्रीकांत कार्लेकर, डाॅ.संजीव नलावडे, प्रा.इरावती नलावडे व अभिजीत घोरपडे यांचा उदघाटन कार्यक्रमात पहिल्याच दिवशी खा.डॉ.मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.भूविज्ञान, भूगोल आणि जैवविविधता बाबत चे कार्य ताकदीने पुढे नेणाऱ्या डाॅ.श्रीकांत गबाले, हार्दिक संकलेचा व सौनीत सिसोळकर या तरुण संशोधकांना ' यंग अचिव्हर' पुरस्काराने शनिवार,दि.११ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता सन्मानित करण्यात येणार आहे.