पुणे : भारती विद्यापीठाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’ (आयएमईडी)च्या वतीने राष्ट्रीय पातळीवरील ‘डॉ.पतंगराव कदम वक्तृत्व स्पर्धा -२०२५’ चे आयोजन दि. १० जानेवारी २०२५ रोजी आयएमईडी (एरंडवणे, पौड रस्ता, पुणे) येथे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उदघाटन भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विवेक सावजी आणि प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांच्या प्रमुख उपस्थितीत १० जानेवारी रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. भारती विद्यापीठ आयएमईडीचे संचालक डॉ. अजित मोरे व उपप्राचार्य डॉ.रामचंद्र महाडिक यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.या स्पर्धेचे हे अकरावें वर्ष आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी या तीन भाषांमधे ही स्पर्धा होणार आहे. प्रथम क्रमांकास रुपये १५ हजार रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक, द्वितीय क्रमांकास रुपये १२ हजार रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक, तृतीय क्रमांकास १० हजार रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक असे पारितोषिकांचे स्वरूप आहे.‘भान ठेवून योजना आखा व बेभान होऊन राबवा'-डॉ.पतंगराव कदम ’, ‘राजकारणातील तरुणाईचा सक्रिय सहभाग ’, ‘ रस्ते सुरक्षा -काळाची गरज ', ‘ मानसिक स्वास्थ’, ‘कृत्रिम बुद्धिमत्ता -मित्र कि शत्रू’, ' लोकशाहीचे अखंडत्व-ईव्हीएम कि मत पत्रिका ', ' पत्रकारिता-आव्हाने विश्वासार्हतेची ', ' प्रकटीकरणाचे सामर्थ्य 'हे स्पर्धेचे विषय आहेत.