पुणे :-कोथरुड मतदारसंघातील रहिवासी सुयोग शहा आणि नारायण पवार हे युवा दिनाचे औचित्य साधून सायकलद्वारे पुणे ते अयोध्या यात्रा करणार आहेत. १० जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कोथरूड येथून ते अयोध्येच्या दिशेने प्रयाण करणार आहेत. त्या दिवशी एकादशी असल्यामुळे आळंदी येथे माऊलींचे दर्शन घेऊन ते पुढे मार्गस्थ होतील. त्यांच्याबरोबर पुणे ते आळंदीपर्यंत कोथरुडमधील सायकलस्वार शुभेच्छा देण्यासाठी सकाळी 6 वाजता जाणार आहेत. आज त्यांच्या जर्सीचे अनावरण आमदार व मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी केले व दोघांचेही त्यांनी अभिनंदन करुन त्यांना यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या.