सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 शहर

महाविद्यालयीन जीवनातच घडतात युवा उद्योजक: डॉ. संगीता जगताप

डिजिटल पुणे    09-01-2025 15:04:57

पुणे  : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालय सांगवी यांच्या संयुक्त विद्यमाने बहि:शाल शिक्षण मंडळ केंद्र अंतर्गत बॅरिस्टर जयकर व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प गुंफताना आपण उद्योजक होऊ शकतो का? या विषयांमध्ये प्रा. रुस्तुम दराडे यांनी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयान जीवनातच आपण उद्योजक होण्यासाठी कोणता व्यवसाय निवडावा, कोणत्या ठिकाणी व्यवसाय करणे योग्य ठरेल, भविष्यामध्ये व्यवसाय वृद्धीसाठी संधी असेल किंवा नाही, तंत्रज्ञान आणि मनुष्यबळाचा किती प्रमाणात वापर होईल याचा सारासार विचार करून युवकांनी उद्योजक होण्यासाठी पुढाकार घेणे काळाची गरज असल्याचे मत व्याख्याते प्रा.रुस्तुम दराडे यांनी व्यक्त केले.

महाविद्यालयीन जीवनातच खरे उद्योजक घडतात तसेच उद्योग व्यवसायामध्ये धोका आणि संधी याचा सारासार विचार करून व्यवसायाची निवड करणे क्रमप्राप्त ठरत असल्याचे मत आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता जगताप यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. विक्रमादित्य मालतुमकर यांनी बहि:शाल कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या व्याख्यानांची माहिती देऊन कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आणि वक्त्यांचा परिचय करून दिला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.ज्योती रामोड यांनी केले. तर आभार प्रा.शेखर बुलाखे यांनी मानले. तांत्रिक सहकार्य आणि संपूर्ण कार्यक्रमाचे छायाचित्रण श्री.प्रणित पावले यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. विजय बालघरे, डॉ. विशाल पावशे, प्रा.संतोष सास्तुरकर, डॉ. दिपाली चिंचवडे, प्रा. प्राजक्ता पाटील, श्री. अशोक मगर तसेच महाविद्यालयातील इतर प्राध्यापक, विभागप्रमुख आणि प्रचंड विद्यार्थी उपस्थित होते.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती