पुणे: हाऊसिंग फायनान्स क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या निडो होम फायनान्स लिमिटेडने नुकत्याच जारी केलेल्या नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर (एनसीडी) ला गुंतवणूकदारांचा जोरदार प्रतिसाद मिळाला असून डिबेंचर विक्री योजनेत उद्दीष्टापेक्षा अधिक पट गुंतवणूक झाली आहे. कंपनीने ५० कोटी रुपयांची रक्कम उभारण्यासाठी प्रत्येकी 1000 रुपयांचे दर्शनी मूल्याचे नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर (“एनसीडी”) विक्रीसाठी आणले होते. या योजनेत ५० कोटी रुपयांची अतिरिक्त निधी उभारण्याचा म्हणजेच ग्रीन शूचा पर्याय होता. अशा रितीने या योजनेतून १०० कोटी रुपयांपर्यंतची रक्कम (“इश्यू”) उभारण्याची कंपनीची योजना होती. कंपनीची गुंतवणूक योजना मंगळवार, 17 डिसेंबर 2024 रोजी खुली झाली आणि मंगळवार, 31 डिसेंबर 2024 रोजी बंद झाली. या योजने 2.05 पट गुंतवणूक झाली. एनसीडीचे उद्दिष्ट निधी उभारण्याचे असून गृह खरेदीदारांना कर्ज देण्यासाठी हा निधी प्रामुख्याने वापरला जाणार आहे.
कंपनीने विकसित केलेले मजबूत मालमत्ता-आधारित व्यवसायाचे प्रारुप आणि परवडणाऱ्या घरांच्या विश्वात दीर्घकालीन वाढीच्या संधींवर गुंतवणूकदारांनी ठेवलेला विश्वास हा महत्वाचा टप्पा अधोरेखित करतो. गेल्या दीड वर्षात निडोतर्फे पाच वेळा एनसीडीच्या माध्यमातून यशस्वीरित्या निधीची उभारणी करण्यात आलेली आहे. निडो होम फायनान्सचे व्यवस्थापन आपला व्यवसाय आणखी वाढविण्यासाठी धोरणात्मक सह-कर्ज देणाऱ्या भागीदारीचा लाभ घेताना भविष्यात भागधारकांचे मूल्य वाढविण्यासाठी वचनबद्ध आहे, तसेच तंत्रज्ञान आणि विश्लेषणासारख्या भविष्याकालीन क्षमतांमध्ये गुंतवणूकीवर कंपनीचा भर राहणार आहे.