पुणे: भारती विद्यापीठचे संस्थापक स्व.डॉ. पतंगराव कदम यांची जयंती तसेच भारती विद्यापीठचे सहकार्यवाह,भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयचे प्र-कुलगुरू डॉ. विश्वजीत कदमयांच्या वाढदिवसानिमित्त भारती विद्यापीठ,पुणे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरासाठी १२०० स्वयंसेवकांनी नोंदणी केली, तर ७०० हून अधिक पिशव्या रक्त संकलित करण्यात आले.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये कुलगुरू डॉ. विवेक सावजी,सहकार्यवाह डॉ.के.डी.जाधव,भारती परिवारचे अध्यक्ष बाबा मामा शिंदे,अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य राजेश प्रसाद, मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे प्राचार्य डॉ. मंदार करमरकर,रक्तदान शिबिराचे समन्वयक व उपप्राचार्य डॉ. सचिन चव्हाण,उपप्राचार्य डॉ.सुनीता जाधव,रक्तदान शिबिर प्रमुख डॉ.अमोल कदम,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रशांत यादव,सहकार्यक्रम अधिकारी प्रा.सागर बंदपट्टे यांचा समावेश होता.
डॉ.सुनीता जाधव यांनी स्वागतपर भाषण केले.डॉ. सचिन चव्हाण यांनी भारती ब्लड बँक, पुरंदर ब्लड बँक आणि जनसेवा ब्लड सेंटरचे प्रतिनिधीचे स्वागत केले.डॉ.अमोल कदम यांनी मान्यवरांचे परिचय करून दिला. प्रा. प्रशांत यादव यांनी आभार मानले. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रिया हिरवे यांनी केले.