सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 शहर

एलिसियम २०२५ या वार्षिक फुड फेस्टीवला उत्स्फुर्त प्रतिसाद खाद्य संस्कृती व पाक कलेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजन

डिजिटल पुणे    20-01-2025 16:08:22

पुणे - महाराष्ट्र राज्य इंस्टीटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी या पदवी अभ्यासक्रमाच्या संस्थेमध्ये अंतिम वर्ष पदवीतील हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी या विद्याशाखेतील विदयार्थ्यांनी स्टार्टअप व ईडी सेल अंतर्गत "एलिसियम" अ मेडिटेरेनियन जर्नी या वार्षिक फुड फेस्टीवलचे यशस्वी आयोजन नुकतेच करण्यात आले होते. खावयानी विविध खाद्य प्रकारचा मनमुराद आस्वाद घेतला. खाद्य संस्कृती व पाक कलेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजन करण्यात आले होते.

 

या फुड फेस्टीवला संस्थेचे अध्यक्ष तथा संचालकडीटीई मुंबई डॉ. विनोद मोहितकरउपाध्यक्ष व सहसंचालकरिजनल ऑफीसडीटीई पुणे डॉ. डि. व्ही. जाधव तसेच प्राचार्या डॉ. सीमा झगडे यांचे मार्गदर्शन लाभले.

 

या कार्यक्रमात २०२१-२०२५ च्या अंतिम वर्षाच्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी फेस्टिव्हल यशस्वी करण्यामध्ये परिश्रम घेतले.   यामध्ये ३८ खाद्य प्रकाराचा यात समावेश होताआंतरराष्ट्रीय पाक कलेचा देखील सहभाग असून १५ प्रकारचे फलाहार तसेच नॉन-अल्कोहोलिक मुलेड वाइन आणि पुदिना आणि तुळशी पेयबेकरी आणि चॉकलेट पदार्थ समावेश होता.  दोनशेहून अधिक मान्यवरांनी या फेस्टिव्हल चे मूल्यमापन केले. विदयार्थ्यांनी पाक कौशल्य,  कलात्मकतासजावटसादरीकरणअथाति स्वागतआदी माध्यमातून विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात आले अशी माहिती  संस्थेच्या प्राचार्या डॉ. सीमा झगडे यांनी दिली.खावयाचे अनुभव व प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाने विदयार्थ्यांनी सहभाग घेणाऱ्याची मने जिंकली.

 

रेस्टॉरंटच्या अनुभवफुलांची सजावटविद्यार्थ्यांचे पोशाखहाताने रंगवलेले टेबल  आखणीखाद्यपदार्थची मांडणी मनमोहक होती. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मनाला आनंद देणारा एक अप्रतिम अनुभव निर्माण झाला होता असे अनुभव खव्यानी व्यक्त केला. सर्वांनीच विद्यार्थ्यांचे व आयोजकांचे कौतुक केले.  

 

संस्थेचे नामवंत प्राचार्यसंस्थेचे माजी विद्यार्थी आणि प्रायोजक यांच्या उपस्थितीमुळे महोत्सवाची शोभा वाढली. सर्जनशीलताकौशल्य आणि आदरातिथ्य यांचा अविस्मरणीय अनुभवाचा  मेळ घालण्याची विद्यार्थ्यांची क्षमता या कार्यक्रमाने दाखवून दिली.  पाककलेला नवे रूप नवे स्थान देण्याकडे विद्यार्थ्यांचा कल दिसून आला. हा फेस्टिव्हल ही एक संकल्पना नसूनसंस्कृतीपाककृती ला प्रोत्साहन देण्याचा हा उत्सव आहे  तसेच विदयार्थ्यांना हॉटेल मॅनेजमेंट ॲड कॅटरिंग टेक्नॉलॉजी क्षेत्रात एक यशस्वी उदयोजक होण्याचे व व्यावसायाचे मार्गदर्शन मिळाले.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती