पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत 'शहनाई वादन आणि शास्त्रीय गायन' कार्यक्रम पुण्यात आयोजित केला आहे.पं.शैलेश भागवत हे शहनाई वादन करणार आहेत. तर डॉ.पराग चौधरी हे भारतीय शास्त्रीय गायन सादर करणार आहेत.हा कार्यक्रम इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स चे पुणे विभागीय कार्यालय प्रस्तुत करणार आहे.शुक्रवार,दि.२४ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजता भारतीय विद्या भवन (सेनापती बापट रस्ता) सभागृहात होणार आहे.
पं.शैलेश भागवत यांना गणेश तानवडे(तबला),उमेश पुरोहित(हार्मोनियम),केदार जाधव,चंद्रशेखर परांजपे(शहनाई)हे साथसंगत करणार आहेत.डॉ.पराग चौधरी यांना संकेत सुवर्णपाटकी(हार्मोनियम),महेश सोळुंके (तबला),शंकर विधाते(व्हायोलिन) हे साथसंगत करणार आहेत.हा कार्यक्रम विनामूल्य असून भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत होणारा २३३ वा कार्यक्रम असल्याची माहिती भारतीय विद्या भवनचे सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी दिली.