पुणे : "अनेक उपक्रम, मनोरंजन, अभ्यासपूर्ण व्याख्याने आणि शैक्षणिक गोष्टींचा समावेश असलेला पर्पल जल्लोष हा खरोखरच प्रेरणादायी कार्यक्रम होता. हा कार्यक्रम मोठ्या समर्पकतेने आयोजित करण्यात आला होता. पी.सी.एम.सी, त्याचे कर्मचारी आणि सहभागी स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त सहकार्याने पार पडलेला हा कार्यक्रम सर्वसमावेशकतेचा आणि सामुदायिक एकात्मतेचा दाखला आहे. अशा विचारशील उपक्रमाचा एक भाग बनणे खूप आनंददायी होते. स्वाणिकेतन-आमचा प्रकल्प दिव्यांगांसाठी घरे तयार करण्यासाठी समर्पित असून माझ्यासाठी ही प्रचंड जवळची गोष्ट आहे. या प्रकल्पा मागची दूरदृष्टी समाजापुढे मांडण्यासाठी आणि समाजात या संबंधी जागरूकता पसरविण्यासाठी या कार्यक्रम उत्तम व्यासपीठ ठरला.”- शशांक परांजपे, व्यवस्थापकीय संचालक, परांजपे स्कीम्स कन्स्ट्रक्शन लिमिटेड