सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 शहर

'द स्किल्स ऑफ रायटिंग रिसर्च पेपर्स' विषयावर प्रशिक्षण वर्ग ;भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज येथे आयोजन

डिजिटल पुणे    21-01-2025 17:13:04

पुणे: भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज, पुणे च्या वतीने  'द स्किल्स ऑफ रायटिंग रिसर्च पेपर्स' या विषयावर मूल्यवर्धित प्रशिक्षण वर्ग (कोर्स) दिनांक २ जानेवारी ते १८ जानेवारी २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आला होता. हा प्रशिक्षण वर्ग डॉ. उज्वला बेंडाळे (अधिष्ठाता आणि प्राचार्या), डॉ. ज्योती धर्म (उपप्राचार्या), डॉ. विद्या ढेरे (आयक्यूएसी  आणि मूल्यवर्धित कोर्स समन्वयक), कु. मयूरा पवार (एलएलएम  समन्वयक आणि नियमित व दूरस्थ डिप्लोमा समन्वयक) आणि डॉ. रोहित सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

१५ दिवसांचा हा कोर्स विशेषतः पदव्युत्तर विद्यार्थी, अकादमिक तज्ञ आणि संशोधकांसाठी आयोजित करण्यात आला होता. यात २०० हून अधिक संशोधक  विविध शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या शैक्षणीक संस्थांमधून आले होते. यात नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूर, आयएलएस लॉ कॉलेज पुणे, उस्मानिया युनिव्हर्सिटी, भारती विद्यापीठ होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, भारती विद्यापीठ पूना कॉलेज ऑफ फार्मसी, भारती विद्यापीठ युनिव्हर्सिटी दिल्ली, गीतारत्तन इंटरनॅशनल बिझनेस स्कूल तसेच विविध कायदा फर्म्स आणि संशोधन संस्थांचा समावेश होता.

'संशोधन' या महत्त्वाच्या पैलूंवर नामांकित तज्ज्ञांनी व्याख्याने दिली. डॉ. वर्षा खंडागळे (रिसर्च पेपरचे घटक), डॉ. शैला डावरे (संशोधन पद्धती आणि साहित्य समीक्षा), डॉ. सुनील गोयल (संशोधन प्रस्ताव तयार करणे), डॉ. प्रिया चोपडे (संशोधन साधने), डॉ. अनुराधा गिरमे (प्लॅजिअरिझम आणि उत्कृष्ट संशोधन पेपर्सचे पुनरावलोकन), डॉ. स्वप्नील बंगाली (संशोधन पेपर्सचे पुनरावलोकन आणि एआय साधने), डॉ. जयश्री मुरली (डेटा संकलन आणि डेटा विश्लेषण), डॉ. युवराज पाटील (संशोधन पेपर्सचे सादरीकरण आणि प्रकाशन), आणि डॉ. रोहित सुरवसे (संशोधन पेपरचा हेतू आणि रचना) यांनी मार्गदर्शन केले.

या कोर्सचे उद्दिष्ट  सहभागी विद्यार्थ्यांना चांगल्या संशोधन पेपर लिहिण्याच्या मूलभूत घटकांची ओळख करून देणे आणि त्यांना प्रकाशनासाठी योग्य संशोधन पेपर्स आणि शैक्षणिक लेख लिहिण्यास सक्षम करणे हे होते.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती