पुणे : १९९० च्या दशकातील 'प्रचिती ' या महाविद्यालयीन संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या अनुभव आणि वाटचालीवर आधारित लेखांचे संकलन असलेल्या 'हे तो प्रचितीचे जगणे' या पुस्तकाचे प्रकाशन दि.२६ जानेवारी २०२५ रोजी ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ.माधव गाडगीळ यांच्या हस्ते प्रबोध सभागृह,ज्ञान प्रबोधिनी (सदाशिव पेठ) येथे होणार असून त्या निमित्ताने प्रचिती कार्यकर्त्यांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.दुपारी ३ ते ७ या वेळेत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे,त्यातील पुस्तक प्रकाशन साडेपाच वाजता होणार आहे. स्नेहालय(अहिल्यानगर) संस्थेचे संस्थापक गिरीश कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला असणार आहे.
वीस कार्यकर्त्यांचे साधारण वर्ष १९९० ते २००० या प्रचिती काळातील अनुभव आणि त्यानंतर त्यांची आपापल्या कार्यक्षेत्रातील केलेली वाटचाल याविषयी प्रत्येकाने विवेचनपूर्वक लेखन केले आहे.वेगवेगळी सामाजिक शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले त्यावेळचे विद्यार्थी- कार्यकर्ते, 'प्रचिती'तिल अनुभव शिक्षणाच्या आधारे पुढे अर्थपूर्ण करिअर म्हणून त्यांनी निवडलेल्या विविधांगी कार्यक्षेत्रातील वाटचालीचा मनोज्ञ पट प्रत्येकाच्या लेखनात समाविष्ट झाला आहे.अजित कानिटकर,विवेक कुलकर्णी ,राजेंद्र आवटे,अश्विनी धर्माधिकारी,सुबोध कुलकर्णी,वैशाली कणसकर ,जयश्री काटीकर यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली .