पुणे: भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेज, पुणे येथील लॉ आर्टिजेन्स सेल (ए.आय. सेल) ने 'कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कायदे-२०२५' या विषयावर चर्चासत्र आयोजित केले. भारतातील विधींच्या कायद्यांवर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रगतीमुळे होणाऱ्या परिणामांचा अभ्यास व समज करून घेणे,हे या चर्चासत्राचे उद्दिष्ट होते. हे सत्र भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त व प्र-कुलगुरू डॉ. विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आले होते.या सत्राला दिल्ली उच्च न्यायालयाचे अधिवक्ता तसेच सायबर व कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कायदे याचे तज्ञ अॅडव्होकेट साक्षर दुग्गल यांनी उत्साहपूर्ण मार्गदर्शन केले.
हे चर्चासत्र डॉ.उज्वला बेंडाळे (अधिष्ठाता व प्रभारी प्राचार्य), डॉ.ज्योती धर्म (उप-प्राचार्य), डॉ.विद्या ढेरे (आयक्यूएसी समन्वयक) व श्रीमती रश्मी दुबे (सहायक प्राध्यापक व समन्वयक, लॉ आर्टिजेन्स सेल) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले. हे सत्र ११ जानेवारी २०२५ रोजी पार पडले.