पुणे : 'भ्रातृमंडळ, पुणे' संस्थेचा स्नेहमेळावा दि.२६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.चित्रपट आणि वेब सिरीज सृष्टीतील दिग्दर्शक संतोष कोल्हे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.प्रजासत्ताक दिन ,'वर्षारंभ' विशेषांकाचे प्रकाशन,सर्वसाधारण सभा ,वयोवृद्धांचा सत्कार,उल्लेखनीय यश प्राप्त मान्यवरांचा सत्कार,यशस्वी उद्योजकांचा सत्कार,सेवानिवृत्तांचा सत्कार,सोहन गिरीश झांबरे यांच्या 'अदूच्या जगात' या पुस्तकाचे प्रकाशन ,चित्रकला स्पर्धा असे अनेक उपक्रम यावेळी आयोजित करण्यात आले आहेत.भ्रातृ मंडळ मुलांचे वसतिगृह (वारजे जुन्या जकात नाक्या मागे,वारजे) येथे हा कार्यक्रम होणार आहे.खानदेश परिसरातून पुण्यात स्थायिक झालेल्या नागरिकांचे भातृ मंडळ हे व्यासपीठ आहे.'भ्रातृमंडळ पुणे' संस्थेचे अध्यक्ष अनिल बोंडे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.