पुणे: वरिष्ठ महिला राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या ट्रिपल महाराष्ट्र केसरी पै.भाग्यश्री मंगेश कोळी यांचा सत्कार पुणे राष्ट्रीय तालीम संघ अध्यक्ष पै. तात्यासाहेब भिंताडे, अर्जुन पुरस्कार विजेते पै. काकासाहेब पवार , विश्व जिम संचालक पै. काशिनाथ ढोणे, माजी नगरसेवक वसंत मोरे, माजी नगरसेवक दिनेश उर्फ़ पिंटू धाडवे, माजी नगरसेवक सौ. रूपाली धाडवे, सौ. पद्मजा शेलार या सर्व मान्यवरानी केला. तसेच पै. तात्यासाहेब भिंताड़े यांनी रोख रक्कम ५१ हजार बक्षिस दिले.पै.भाग्यश्री मंगेश कोळी या विश्व जीम च्या सदस्य आहेत.
यावेळी सुनील मांगडे, दीपक गुजर, राजाभाऊ शेळके, संदीप नरवडे, नरेंद्र मारळ,सुदाम दांगट,लोक जनशक्ती पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय आल्हाट, संपर्कप्रमुख राहुल उभे, गोकुळ नगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मधुसूदन कोरेकर, महेश कोळी तसेच इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.कात्रज कोंढवा रोड विश्व जिम समोर २७ जानेवारी २०२५ रोजी रात्री हा कार्यक्रम झाला.