सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • ४ ॲागष्टला HDFC बॅकेचे UPI पेंमेंट बंद
 शहर

ओपन आयडियाज राष्ट्रीय स्पर्धा पारितोषिक वितरण ३१ जानेवारी रोजी ; लहान घरे आरामदायी बनवणाऱ्या कल्पनांचा गौरव

डिजिटल पुणे    28-01-2025 15:59:35

पुणे:'ओपन आयडियाज राष्ट्रीय स्पर्धा-२०२४'  आणि हाउसिंग स्टुडिओ उपक्रमाचा पारितोषिक वितरण समारंभ ३१ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता मराठा चेंबरचे सुमंत मुळगावकर सभागृह(सेनापती बापट रस्ता,पुणे) येथे आयोजित करण्यात आला आहे.ही स्पर्धा हॅबिटॅट फोरम (आयएनएचएएफ) आणि सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्ह्स यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती.यामागील उद्दिष्ट लहान व कमी खर्चाची घरे अधिक राहण्यायोग्य बनवण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय शोधणे हे होते.  

कार्यक्रमात बरजोर मेहता(अध्यक्ष,सीईपीटी युनिव्हर्सिटी,अहमदाबाद) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.डॉ.राजेंद्र निंबाळकर(माजी मुख्य अधिकारी,म्हाडा)  आर्किटेक्ट अमित बापट (डिझाईन हेड-वेस्टईस्ट झोन,गोदरेज प्रॉपर्टीज) यांची प्रमुख उपस्थिती असून तेही मार्गदर्शन करतील.  

या स्पर्धेसाठी वास्तुविशारद,इंटीरियर डिझायनर,नियोजनकर्ते,अभियंते,वरिष्ठ विद्यार्थी,स्वयंसेवी संस्था,शासकीय संस्थांमध्ये काम करणारे व्यावसायिक तसेच झोपडपट्टी पुनर्वसन व उन्नती क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा सहभाग मागवण्यात आला होता.प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) व इतर परवडणाऱ्या गृहनिर्माण योजनांसाठी घरांची रचना अधिक कार्यक्षम,राहण्यायोग्य आणि शाश्वत बनवण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय शोधणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.  

ही स्पर्धा मे २०२४ मध्ये सुरू करण्यात आली होती.एकूण २८७ स्पर्धक नोंदणीकृत झाले व ६५ प्रस्ताव प्राप्त झाले.त्यापैकी पाच प्रस्ताव परीक्षकांनी निवडले.याच  विषयावर आधारित १२ आठवड्यांचा हाउसिंग स्टुडिओ उपक्रम देखील स्पर्धेसोबतच राबवला गेला.हे स्टुडिओ भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर,पुणे येथे हॅबिटॅट फॉर्म द्वारे पथदर्शी स्वरूपात राबवले गेले.पुण्यातील ब्रिक ग्रुप ऑफ इंस्टिट्यूट्स,विश्वकर्मा विद्यापीठ आणि वेल्लोर इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी  वेल्लोर यांच्यासह तीन महाविद्यालयांनी सहभाग घेतला.या कार्यक्रमातून एकूण २१ प्रस्ताव सादर करण्यात आले, परीक्षक मंडळाने त्यातील तीन प्रस्ताव विजेते घोषित केले.  


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती