पुणे: भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत ' तबला वादन आणि ओडीसी नृत्य ' कार्यक्रम पुण्यात आयोजित केला आहे.शताब्दी मलिक (पश्चिम बंगाल) या ओडीसी नृत्य सादर करणार आहेत तर जिग्नेश शेठ (गुजरात) हे तबला वादन करणार आहेत.हा कार्यक्रम इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स चे पुणे विभागीय कार्यालय प्रस्तुत करणार आहे.शनीवार,दि.८ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजता भारतीय विद्या भवन (सेनापती बापट रस्ता) सभागृहात होणार आहे.हा कार्यक्रम विनामूल्य असून भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत होणारा २३४ वा कार्यक्रम असल्याची माहिती भारतीय विद्या भवनचे सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी दिली.