पुणे : सिंहगड इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजी अँड सायन्स नऱ्हे राष्ट्रीय सेवा योजना (अ -१०२) एकक द्वारा “विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबीर” वांजळवाडी कुरण खुर्द, तालुका-वेल्हे, जिल्हा-पुणे येथे दिनांक २५/०१/२०२५ ते ३१/०१/२०२५ या कालावधीमध्ये पार पडले.सदर शिबिरात “युथ फॉर माय भारत आणि डिजिटल लिटरसी ” अंतर्गत “जनजागृती” या विषयावर प्रबोधन करण्यात आले, तसेच या शिबिरात स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नील कंठेश्वर मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला. गावातील मंदिराच्या आवारात रंगकाम देखील करण्यात आले. गावाचे सर्वेक्षण करण्यात आले.
गावातील प्राथमिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना पुस्तक वाचनाचे महत्त्व सांगण्यात आले तेथील पानशेत माध्यमिक विद्यालयांमध्ये माय भारत पोर्टल, नवीन तंत्रज्ञान, डिजिटल इंडिया, उद्योजकता विकास यासंदर्भात व्याख्याने आयोजित करण्यात आली होती.गावामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे महिला सबलीकरण ,आयुष्मान कार्ड ,विकसित भारत, लोकसंख्या नियंत्रण याची जनजागृती करणाऱ्या रॅली ,लघु नाटिका, पथनाट्य सादर करण्यात आले.प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भारतीय संविधान उद्देशीकेचे वाचन करण्यात आले.
सध्याच्या तणावाच्या वातावरणातून मुक्ततेसाठी योगा, प्राणायाम, सूर्य नमस्कार,मनशांती ध्यान यासाठी प्रबोधन करण्यात आले. या शिबिरा दरम्यान ग्रामस्थांच्या व किशोवयीन मुलामुलींची अंनेमिया चाचणी करून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. डिजीटल डिटॉक्स,भारतीय प्रजासत्ताक, मतदार जन जागृती, लिंग समानता याविषयावर गटचर्चा करण्यात आली. शिबिरामध्ये श्री ओंकार बोत्रे, श्री.संकेत देशपांडे, श्री.राहुल कुलकर्णी, श्री.भास्कर गोखले , प्रा.भीमसेन चव्हाण या मान्यवरांची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती.ग्रामस्थांच्या मनोरंजनासाठी महाराष्ट्राची परंपरा लाभलेली सांस्कृतिक गीते, पोवाडा, भारुड ,शास्त्रीय संगीत, भक्ती गीते, अभंग ,देशभक्तीपर गीते, , गणेश वंदना, देवी गीते, मंगळागौरीचे खेळ, जोगवा सादर करण्यात आले.
सदर शिबिरासाठी गावच्या सरपंच सौ. प्रगती रवींद्र घाडगे ,श्री रवींद्र घाडगे,उपसरपंच श्री. वैभव ठाकर ,ग्रामसेवक श्री. डी. पी. काशीद, श्री.गणेश ठाकर व परिवार तसेच संपूर्ण ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.शिबिरातील सर्व कार्यक्रमांचे आयोजन हे प्राचार्य श्री. श्रीराम मार्कंडे, उपप्राचार्या डॉ. वंदना रोहोकले आणि सर्व विभागप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सदर शिबिराचा आढावा तसेच मान्यवरांचे आणि सर्व ग्रामस्थांचे आभारप्रदर्शन हे श्री सचिन वेळापुरे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी यांनी केले. या कार्यक्रमाच्या आयोजन करण्यासाठी सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. एम. एन. - नवले व संस्थापक सचिव डॉ सुनंदा नवले, संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. रचना नवले अष्टेकर व उपाध्यक्ष डॉ.रोहित नवले यांचे प्रोत्साहन लाभले.