पुणे :- नाशिक येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातील जवान कैलास कसबे हे वाहन चालक होते. अवैध दारू विरोधी कारवाई आरोपीच्या वाहनाने धडक दिली व त्यामध्ये जवान तथा कैलास कसबे यांचा मृत्यू झाला. नाशिक राज्य उत्पादक शुल्क विभाग भरारी पथक क्रमांक 1 यांनी धाब्यावर रात्री कारवाई केली होती. उपमुख्यमंत्री तथा राज्य उत्पादक शुल्क मंत्री अजित पवार यांनी दिवंगत कसबे यांच्या वारसांना साडेसात लाख रुपये नुकसान भरपाई मंजूर केली आहे.
कर्तव्य बजावत असताना जवान कैलास कसबे यांचा मृत्यू झाला आहे. ही रक्कम तुटपुंजी असल्याचे आम आदमी पार्टी शहराध्यक्ष सामाजिक न्याय विभाग प्रशांत कांबळे यांनी सांगितले मध्यप्रदेश मध्ये चेंगरा चेंगरी मध्ये मृत्युमुखी पावलेल्यांना 25 लाख रुपये देण्यात आले. महाराष्ट्र राज्य उत्पादक शुल्क टॅक्सच्या माध्यमातून मोठा कर वसूल करत असते. त्यामुळे जवान कैलास कसबे यांना पन्नास लाख रुपये देण्यात यावे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांला निवेदन द्वारे विनंती करण्यात आप कडून येत आहे.