सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 शहर

शिवजयंतीला महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीची सर्वात मोठी अभिवादन मिरवणूक ! आझम कॅम्पस ते लाल महाल मार्गावर अभिवादन मिरवणूक

डिजिटल पुणे    15-02-2025 14:06:39

पुणे : ‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विद्यार्थ्याच्या भव्य अभिवादन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, दि. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी साडेआठ वाजता संस्थेचे अध्यक्ष तसेच 'डॉ.पी.ए.इनामदार युनिव्हर्सिटी 'चे कुलपती डॉ.पी.ए.इनामदार यांच्या हस्ते मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा. इरफान शेख यांनी दिली.

पुण्यातील अल्पसंख्य, बहुजन समाजातील विद्यार्थी यांचा सहभाग असलेली ही सर्वात मोठी शिवजयंतीदिनाची अभिवादन मिरवणूक असणार आहे .एकूण १०  हजार विद्यार्थी या मिरवणुकीत सहभागी होणार असून, मिरवणुकीचे हे २४ वे वर्ष आहे.आझम कॅम्पस ते लाल महाल असा या मिरवणुकीचा मार्ग आहे.पूना कॉलेज,जूना मोटर स्टँड, पद्मजी पोलिस चौकी,संत नरपतगीरी चौक नाना चावडी चौक,अरुणा चौक, अल्पना टॉकीज,डुल्या मारूती चौक,तांबोळी मशीद,सोन्या मारुती चौक,मोती चौक,फडके चौक मार्गे लाल महाल येथे मिरवणुकीची सांगता होईल.

मिरवणुकीत आझम कॅम्पस परिवारातील शैक्षणिक संस्थांचे सर्व प्राचार्य,पदाधिकारी,कर्मचारी,दरबार ब्रास बॅण्डची दोन पथके,ढोल-ताशांचे पथक,शोभीवंत बैलगाडी,तुतारी,नगारेदेखील सहभागी होणार आहेत.दरवर्षी संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महंमद पैगंबर यांना अभिवादन करण्यासाठी भव्य मिरवणुका काढल्या जातात,अशी माहिती पत्रकाद्वारे देण्यात आली.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती