पुणे : महाराष्ट्रातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे संस्थापक स्व. बाबुरावजी घोलप स्मृती सप्ताह निमित्त सांगवी येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील संगणक शास्त्र विभागाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय 'एस - कॅप्चा' आंतर महाविद्यालयीन स्पर्धा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. डाटा सायन्स लॅबचे सहसंस्थापक जावेद इनामदार यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्या व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता जगताप या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
याप्रसंगी महाविद्यालयाच्या उप प्राचार्या डॉ. वंदना पिंपळे, महाविद्यालय विकास समिती सदस्य प्रा. विजय घारे, इलेक्ट्रॉनिक्स विभाग प्रमुख प्रा. अनंत पवार, संगणक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. सीमा चौहान आदी उपस्थित होते.सदर दोन दिवसीय आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत कोन बनेगा टेक गुरु, वेब पेज डिझाईन, बग ट्रॅकर, ट्रेझर हंट, पोस्टर अँड प्रोजेक्ट कॉम्पिटिशन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सहभागी विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या तांत्रिक कौशल्याची चुणूक दाखवून दिली.
सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षिसे व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.दोन दिवसीय स्पर्धेच्या संपूर्ण यशस्वीतेसाठी प्रा. सोनल कदम, समन्वयक प्रा. अर्चना सुर्यवंशी, प्रा. चेतना पाटील, प्रा. काजल कांबळे, प्रा. गायत्री जाधव, प्रा. दिपाली शिंदे, प्रा. वृषाली कोकरे, प्रा. ऋतुजा कदम, प्रा. श्रुती ओवेकर, प्रा. स्वप्ना तांबे, प्रा. नेहा बारभाई, प्रा. सुचिता खडसे, प्रा. प्रितम पगार यांच्यासह सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.