पुणे : भारतीय प्रजासत्ताकाच्या अमृत महोत्सव निमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्या व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता जगताप यांच्या संकल्पनेतून इतिहास विभागातील विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक महत्त्व असलेल्या आगाखान पॅलेसला भेट दिली. याप्रसंगी इतिहास विभाग प्रमुख डॉ. जितेंद्र वडशिंगकर, समन्वयक प्रा. तुषार भुसे, डॉ. ज्योती रामोड उपस्थित होते.
सदर भेटीमध्ये समन्वयक प्रा. तुषार भुसे यांनी सहभागी विद्यार्थ्यांना आगाखान पॅलेसचे ऐतिहासिक महत्त्व समजावून सांगत असताना पॅलेसच्या निर्मितीत ग्रीक स्थापत्य शैलीचा असणारा प्रभाव व मुळात इंडो-ग्रीक स्थापत्य शैली काय याविषयी सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर पॅलेसमध्ये असलेल्या संग्रहालयातील विविध गोष्टींची विद्यार्थ्यांशी चर्चा करत विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना अभ्यासपूर्ण उत्तरे देत त्यांच्या ज्ञानात भर घातली. या भेटीसाठी इतिहास विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.