सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • केंद्रीय मंत्री अमित शहा आज पुणे दौर्यावर
 शहर

भाजपा कार्यकर्ता देवेंद्र जोग मारहाण प्रकरणी चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्रची घेतली भेट... आम्ही सर्व पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचे पाटील यांचे आश्वासन

डिजिटल पुणे    22-02-2025 16:14:34

पुणे : पुण्यातील कोथरूड भागात दुचाकीस्वार अभियंता देवेंद्र जोग या तरुणाला मारहाण झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली.द्ध गुन्हा दाखल शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीतून दुचाकी काढण्याचा प्रयत्न करत असताना तरुणाला मारहाण करण्यात आली. घटनेमध्ये मारहाण करण्यात आलेला तरुण देवेंद्र जोग भाजपचा कार्यकर्ता असल्याचे समोर आले आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी  देवेंद्रची भेट घेऊन त्याची विचारपूस केली. सदर घटनेनंतर आम्ही सर्व पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचे पाटील यांनी आश्वस्त केले.

या मारहाण प्रकरणी तिघांविरुकरण्यात आला असून,या प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. कोथरूड परिसरात गाडीचा धक्का लागल्याने जाब विचारल्यामुळे एका तरुणाला चार जणांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.19 फेब्रुवारी रोजी कोथरूड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मिरवणूक निघाली होती, त्यावेळी मिरवणुकीच्या दरम्यान चार जणांनी बाईकवरून जाणाऱ्या देवेंद्र जोग यांना कट मारला. देवेंद्र जोग यांच्याशी त्या चार जणांची वादविवाद झाला आणि त्यामुळे त्या चौघांनी मिळून देवेंद्र जोग यांना बेदम मारहाण केली. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी चौघांविरुद्ध गंभीर कलम 307 म्हणजे खून करण्याचा प्रयत्न अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती