पिंपरी-चिचवड :- डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी गणेश हुंबे,प.महाराष्ट्र सहसचिवपदी अजिंक्य स्वामी तर पिंपरी-चिचवड शहर अध्यक्षपदी प्रशांत साळुंखे यांची एकमताने निवड करण्यात आल्याची घोषणा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी येथे केली.राज्य कार्यकारिणी व जिल्हा अध्यक्ष गणेश हुंबे लवकरच पुणे जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करणार असल्याचेही राजा माने यांनी सांगितले.
पुणे जिल्हा अध्यक्ष अजिंक्य स्वामी, पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष विकास शिंदे यांच्या उपस्थितीत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी एकमताने करण्यात आल्या.या बैठकीला संघटनेचे राज्य सचिव महेश कुगांवकर,राज्य सहसचिव केतन महामुनी,संघटक अमोल पाटील,राज्य सरपंच परिषदेचे नेते व ज्येष्ठ पत्रकार संजयबापू जगदाळे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सदस्य या बैठकीला उपस्थित होते.
