सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • पुण्यात अघोषित पाणीकपात,विविध भागातील पाणीपुरवठा विस्कळीत
 शहर

नाही व्हायचं गुंडासमोर षंढ,चला पुकारू कायदेशीर बंड ;आम आदमी पार्टी तर्फे जिल्हाधिकारी, पोलीस कमिशनर यांना निवेदन

डिजिटल पुणे    10-03-2025 15:44:44

पुणे  : पुणे शहर हे संस्कृतीचे माहेरघर असून या शहरात अनेक नामांकित लोक तसेच छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, लोकमान्य टिळक, फातिमा बी शेख असे इतर अनेक महापुरुष होऊन गेले. तसेच त्यांचे वास्तव्य सुद्धा याच पुणे शहरात ठिकाणी लाल महल शनिवार वाडा महात्मा फुलेवाडा असे अनेक ठिकाणी  या शहराची भारतामध्ये भारताच्या बाहेर ओळख पुण्याची आहे. त्याचप्रमाणे अनेक कवी क्रांतिकारी उद्योजक या पुण्यामध्ये घडले आहेत. विद्येचे माहेरघर म्हणून सुद्धा पुण्याची एक वेगळी ओळख आहे. अशा सुजलाम सुफलाम पुण्याला गुन्हेगारीचे ग्रहण लागले आहे. मी आपणास या पत्राद्वारे विनंती करतो. आपण पुण्याचे पालकत्व स्वीकारले आहे. कायदा सुव्यवस्था राखणे हे आपल्या हातात असून सध्याची परिस्थिती पाहता.

पुण्यामध्ये गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात वाढली असून आपण ह्याच्यावरती उपाय योजना तर करत आहातच. परंतु खेदाने सांगावे लागते. आपला वचक हा राहिलेला नसून आपण कायद्याची अंमलबजावणी कुठेतरी कमी पडताना दिसतीये. त्याचे कारण विविध पक्षाची लागे संबंध असल्यामुळे कुठेतरी कायदा सुव्यवस्था राखण्यास कमी पडताना दिसते. लाचारीच्या विळख्यात काही अधिकारी असल्यामुळे गुन्हेगारी मध्ये दिवसेंदिवस वाढ ही होताना दिसतीये. लहान मुले, वयोवृद्ध, स्त्रिया, कोयता गॅंग, गुन्हेगारी, भ्रष्टाचार, अशी गुन्हेगारी वाढण्याचे कारण  आजी-माजी नगरसेवक, आमदार, खासदार यांच्या जवळ अवतीभवती असलेले जी कोण लोक असतील त्यांच्यावरती तुम्ही आत्तापासून पंजा आवळायला सुरुवात करावी. त्याशिवाय तुमचे वरदस्त हे दिसणार नाही.

कायदा सुव्यवस्था त्याशिवाय राहणार नाही. पैशातून पॉवर आणि पॉवर मधून पैसा गोळा करणे ह्यांची सवय बनली आहे. परंतु सर्वसामान्यांची काय ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान अर्पण केले  अधिकार दिले त्यात संविधानाची पायमल्ली होताना अनेक शासकीय यंत्रणा करताना दिसतात. ह्या सर्वांचं भान ठेवून  आपण कायदा सुव्यवस्था राखण्यास सक्षम आहात. पुढील आपणास कडून येत्या दिवसांमध्ये गुन्हेगारी कमी होताना दिसेल. सर्वसामान्य लोक भयभीत न होता. बाहेर पडतील असे निवेदन आम आदमी पार्टी कडून शहराध्यक्ष प्रशांत कांबळे सामाजिक न्याय विभागातर्फे देण्यात आले.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती