सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 शहर

जागतिक महिला दिनी भारत विकास परिषदे तर्फे दिडशे रुग्णांची आरोग्य तपासणी

डिजिटल पुणे    12-03-2025 12:20:49

पुणे: भारत विकास परिषदेतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त भव्य आरोग्य शिबीरात दिडशे जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली.जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रोहन  मिथीला सोसायटी विमान नगर पुणे येथे भारत विकास परिषद पुणे पूर्व शाखेच्या वतीने भव्य असे आरोग्य शिबिर आयोजित केले होते. यावेळी महिलांची कॅन्सरची तपासणी , डोळ्याची तपासणी , दातांची तपासणी , ओबेसिटि  - बी एम आय  तपासणी, थायरॉईड तपासणी , मोतीबिंदू तपासणी , अवयव दान बाबत जागृती व नोंदणी करण्यात आली याबरोबरच रक्त दान शिबिर आयोजित केले होते यावेळी असंख्य . यावेळी महिला व जेष्ठ नागरिक यांचे तपासणी व पुढील उपचारा बाबत ससून रुग्णालयाच्या तज्ञ डॉक्टर यांच्या माध्यमातून आणि सहकाऱ्यातून भव्य असे आरोग्य शिबिर यशस्वी पणे पार पाडले.

सदरील आरोग्य शिबिरात १५० रुग्णांची तपासणी करण्यात आली.  सदरील आरोग्य शिबिर ही जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राज्य शासनाचे १०० दिवस आरोग्य प्रकल्पा अंतर्गत समाज सेवा विभाग ससून रुग्णालय पुणे यांच्या वतीने घेण्यात आले. यावेळी ससून रुग्णालयाच्या तज्ञ डॉक्टर यांच्या बरोबरच भारत विकास परिषद पुणे पूर्व शाखेच्या अध्यक्ष डॉ. शंकर मुगावे, सचिव रणजीत नंबिसन,  उपाध्यक्ष श्री व सौं. वेंकटेश पत्की, श्री व सौं. प्रा. बाहेती सर , श्री व सौं.मुथा सर ,श्री व सौं. सुरुंगे सर, श्री व सौं. चनशेट्टी आणि इतर सदस्य रोहन मिथीला सोसायटी चे अध्यक्ष व सचिव  आणि इतर सदस्य यांनी शिबिर यशस्वीते साठी प्रयत्न केले.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती