सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 शहर

पुणेकरांसाठी महत्त्वाची वार्ता! धुलीवंदन सणानिमित्त मेट्रो सेवा राहणार बंद

डिजिटल पुणे    13-03-2025 15:49:02

पुणे : राज्यासह देशभरामध्ये होळी आणि धुलिवंदनाचा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जात आहे. पुण्यामध्ये देखील हा उत्साह दिसून येत आहे. पुणेकरांसाठी मेट्रो सेवेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पुण्यातील मेट्रोसेवा ही सणानिमित्त बंद राहणार आहे. याबाबत पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीट करुन माहिती दिली आहे.

पुण्यातील अंतर्गत सेवेमध्ये पीएमपीएमएल बससेवेबरोबरच मेट्रो देखील महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मेट्रो सेवा अंतर्गत वाहतूकीमध्ये मोठी दिलासादायक ठरत आहे. शहरातील वाहतूक कोंडी यामुळे कमी झाली असून प्रदूषणावर देखील नियंत्रण आणण्यास मदत होत आहे. दररोज लाखो प्रवासी पुणे मेट्रोच्या सेवेचा लाभ घेत आहेत. नोकरदार वर्ग आणि विद्यार्थ्यांसाठी मेट्रो सेवा सुखकर ठरत आहे. पण सध्या धुलिवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो सेवा बंद ठेवण्यात येणार आहे.

आज (दि.13) होळीचा सण आहे. तर उद्या धुलिवंदन (दि.14) साजरे केले जाणार आहे. यामुळे धुलिवंदनच्या दिवशी पुणे मेट्रो बंद राहणार आहे. राज्यात आज होळी साजरी होत आहे. यानिमित्ताने पुणे मेट्रोकडून विशेष आवाहन करण्यात आले आहे. पुणे मेट्रोकडून विशेष आवाहन करण्यात आले आहे. उद्या १४ मार्च रोजी सकाळी ६.०० ते दुपारी ३.०० या वेळेत पुण्यात मेट्रो सेवा बंद राहणार आहे. दुपारी ३:०० ते रात्री ११:०० या वेळेत पुणे मेट्रोची प्रवासी सेवा नियमित सुरु असेल. याबाबत पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी टि्वट करीत माहिती दिली आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती