सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • अमृता फडवणीस यांनी भाऊ रंगारी गणपतीची आरती
  • समाजसेवा करण्याचा सल्ला केजरीवाल यांनी मानला नाही : आण्णा हजारे
 व्यक्ती विशेष

महाराष्ट्र देशाचे ग्रोथ इंजिन; जनतेच्या विकासासाठी शेवटच्या घटकांपर्यंत कल्याणकारी योजनांचा लाभ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

डिजिटल पुणे    30-08-2024 10:24:30

मुंबई: महाराष्ट्र हे देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे. ते देशाचे ग्रोथ इंजिन आहे. राज्य सरकार महिला, युवक, शेतकरी, ज्येष्ठ नागरिकांसह सर्व स्तरातील नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  केले.

आयटीसी ग्रँट सेंट्रल हाँटेल मुंबई येथे न्युज १८ इंडिया या वाहिनीच्या डायमंड  स्टेट समिट महाराष्ट्र या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे प्रगतिशील महाराष्ट्र या चर्चेत बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले,राज्यात महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत एक कोटी पेक्षा अधिक महिलांच्या खात्यात १५०० रुपयांचे दोन हप्ते जमा करण्यात आले. अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन गॅस सिलिंडर देण्याची योजना सुरु करण्यात आली आहे. मुलींना उच्च शिक्षण मोफत, महिलांना प्रवासात सवलत या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर बनवण्याचे काम राज्य शासन करत आहे. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानातून प्रधानमंत्री यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प आपण केला असल्याचे असल्याचे त्यांनी सांगितले.

देशात ३ कोटी ‘लखपती दीदी’ बनविण्याच्या प्रक्रियेत महाराष्ट्राचा वाटा मोठा असेल. देशातील तीन कोटी दीदी मध्ये राज्यातील ५० लाख दीदींचा समावेश राहील. देश ५ ट्रिलियन डाँलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहे. यात महाराष्ट्राचा वाटा मोठा राहणार असून १ ट्रिलियन डाँलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात विकासाची विविध कामे प्रगतीपथावर आहेत. समृद्धी हायवे, कोस्टल रोड बनवला. मेट्रो प्रकल्पाची कामं प्रगतीपथावर आहेत. राज्यात रस्त्याची कामेही वेगाने सुरू आहे. मुंबईत वेगाने मेट्रोचे जाळे पसरत आहे. दोन वर्षात देशाच्या विकासात राज्याचे मोठे योगदान आहे. राज्यात पयाभूत सुविधांची कामे वेगाने सुरू आहेत. दावोसमध्ये अनेक सामंजस्य करार करण्यात आले आहे. महाराष्ट्रात उद्योग क्षेत्र वेगाने विकासित होत आहे.यामुळे राज्यात रोजगार निर्मितीसाठी चालना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

रायगड जिल्ह्यातील दिघी बंदराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. साडेपाच हजार कोटी खर्च करून दिघी बंदर उभारण्यात येणार आहे. तब्बल ६ हजार एकर परिसरात हे बंदर उभारण्यासाठी  केंद्र शासनाने ७६ हजार कोटींच्या वाढवण बंदर विकासाला सहाय्य केले आहे. भूमिपूजन समारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहेत. राज्यात  मोठ्या प्रमाणावर उद्योग येत आहेत. त्यांना विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. बाहेरून येणाऱ्या उद्योगांना  शासनाविषयी विश्वास निर्माण झाला असल्याने अनेक नवीन सामंजस्य करार करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री  शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्यात पायभुत सुविधा मोठ्या प्रमाणावर निर्माण करण्यात आल्या आहेत. समृद्धी महामार्ग, अटल सेतू, कोस्टल रोड नागरिकांना वाहतूकीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे नागरिकांचा वेळ, पैसे यांची बचत होऊन आणि प्रदूषण नियंत्रण होण्यासही मदत झाली आहे.

सर्वसामान्य घरातील महिलांना घर चालविण्यात येणाऱ्या अनेक अडचणी लक्षात घेऊन आम्ही ‘मुख्यमंत्री-लाडकी बहीण’ योजना सुरू केली. १ कोटी पेक्षा जास्त  महिलांनी या योजनेचा आतापर्यंत लाभ घेतला आहे. तसेच लाडकी बहीण योजनेबरोबरच लाडका भाऊ योजना म्हणजेच युवा प्रशिक्षण योजना सुरू झाली आहे. त्याअंतर्गत आपण मुलांना सहा हजार, आठ हजार, दहा हजार याप्रमाणे विद्यावेतन देऊन कौशल्य विकासावर आधारित रोजगार निर्मिती करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांसाठी अनेक सवलती, योजना सरकारने तयार केल्या आहेत. एक रुपयात पीक विमा योजना सुरू केली आहे. शेतकऱ्यांचे ७.५ एचपी पर्यंतचे वीज बील माफ करण्यात आले आहे. जे शेतकरी सोलर पंप लावण्यास इच्छुक असतील त्यांना देखील सरकार मदत करत आहे. शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी अनेक निर्णय घेण्यात आले आहेत.

महाराष्ट्रातील नक्षलवाद हटविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. नक्षलग्रस्त भागात शाळा, महाविद्यालये, रुग्णालये इत्यादी सुविधांमुळे आता राज्यातील नक्षलवाद नष्ट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती