सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • अमृता फडवणीस यांनी भाऊ रंगारी गणपतीची आरती
  • समाजसेवा करण्याचा सल्ला केजरीवाल यांनी मानला नाही : आण्णा हजारे
 व्यक्ती विशेष

विधानसभा निवडणुकीसाठी पुण्याची जबाबदारी मोहोळ आणि मुंढेकडे

डिजिटल पुणे    31-08-2024 14:24:19

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपने पुणे शहरात येणाऱ्या आठ विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व आमदार पंकजा मुंढे यांच्याकडे देण्यात आली आहे.

 त्यानुसार मोहोळ यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका घेऊन आढावा घेण्यास सुरुवात केली आहे, तर पुढील आठवड्यापासून मुंढे या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. 

पुणे लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या कसबा पेठ, पर्वती आणि पुणे कॉन्टोन्मेंट या तीन मतदारसंघाची जबाबदारी खासदार व केंद्रीय राज्यमंत्री  मुरलीधर मोहोळ यांच्याकडे देण्यात आली आहे.  शिवाजीनगर, कोथरूड, वडगावशेरी, आणि खडकवासला या मतदारसंघाची जबाबदारी पंकजा मुंढे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती