सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • आपल्या आतिशी दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री
  • चंद्रकांत दादा यांच्या ताफ्यातील गाडीला मद्यधुंद कार चालकाने दिली धडक.,चंद्रकांत दादा सुखरूप
  • आज सकाळी दगडूशेठ गणपतीची अजित पवार यांचे हस्ते पूजा
  • अमृता फडवणीस यांनी भाऊ रंगारी गणपतीची आरती
 व्यक्ती विशेष

आपच्या आतिशी दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री

डिजिटल पुणे    17-09-2024 16:02:47

नवी दिल्ली : आज दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी आतिशी यांची निवड केली गेली आहे. त्या आतीशी मार्लेना/ सिंग विषयी... दोनच दिवसांपूर्वी अरविंद केजरीवाल यांनी सर्वांना धक्का देत आपण राजीनामा देणार असल्याचे सांगितले होते. खरे तर अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने जामीन देताना राज्यपालांकडे जाणाऱ्या सर्व फाईल वरती सह्या करण्याची मुभा दिलेली होती. त्यामुळे आप चे इतर सर्व मंत्री स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकत होते. ज्याला राज्यपालांची मान्यता लागत होती, तेवढ्याच फाईल अरविंद केजरीवाल यांच्याकडे सही करण्यासाठी यायच्या. त्यामुळे भाजप जो दावा करते आहे, की त्यांना घातलेल्या अटींमुळे त्यांनी राजीनामा दिला हे खरे नव्हे आणि दुसरी मुख्य गोष्ट म्हणजे सुप्रीम कोर्टा मधल्या दुसऱ्या जजनी या अटी शर्तीन वरती सुद्धा आपली असहमती व्यक्त केलेली होती. केजरीवालांच्या एका फाईट मुळे भाजपची हवा टाईट झालेली आहे.

अतिशी या प्राध्यापक जोडप्याच्या कन्या. त्यांच्या नावामध्ये मार्क्स आणि लेनिन चा संदर्भ आहे आणि म्हणून मार्लेना हे जोडनाव आई-वडिलांनी दिले होते असे सांगितले जाते. यावरूनही त्यांच्यावर भरपूर टीका झालेली होती. आतिशी यांच्या आई वडिलांच्या ईतर विषयावरील भूमिके वरून सुद्धा त्यांच्यावर भाजप सध्या टीका करते आहे. भाजपचे तेव्हाचे उमेदवार गौतम गंभीर यांनी अत्यंत अपमानास्पद पत्रके छापली असा आरोप केला गेला होता. त्या पत्रकामध्ये आतीशी यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी टीका टिप्पणी होती. अर्थात महिला राजकारणात आल्यावर त्यांना अशा वैयक्तिक निंदानालिस्ती ला सामोरे जावे लागते हे भारतातील पुरुष प्रधान व्यवस्थेचे लक्षण आहे.

आतिषी या सुरुवातीला दिल्लीत शिकल्या असून पूढे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी येथून त्यांचे उच्च शिक्षण पूर्ण केलेले आहे. भारतात आल्यावर मध्य प्रदेश मध्ये सामाजिक संस्थांबरोबर अनेक वर्षे त्यांनी काम केले आहे. त्यानंतर राजकारणात आल्यावर दिल्लीचे शिक्षण मंत्री मनीष सिसोदया यांच्या टीम मध्ये 0 रुपये मानधनावर सल्लागार म्हणून काम केले आहे. ते भाजपाला सहन होत नसल्यामुळे त्यांच्या वरती तांत्रिक बाबींच्या सहाय्याने तक्रारी केल्यामुळे ते पद त्यांना सोडायला लागले. अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यावर आणि सिसोदिया यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर मागच्या वर्षी मार्चमध्ये अतिशी यांच्याकडे शिक्षण तसेच अर्थ व इतर अनेक खाती आली. हॅप्पीनेस अभ्यासक्रम तसेच उद्योजकता अभ्यासक्रम शाळां मधील मूलभूत सुविधा सुधारणा यामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. दिल्लीत शिक्षणावरती सर्वाधिक खर्च केला जातो.  महिलांसंदर्भातील अनेक योजना तसेच वीज माफी सह इतर योजना दिल्लीमध्ये राबवल्या जात असताना तेथील बजेट हे शिलकीचे बजेट आहे, ते तोट्यात नाही ही बाब महत्त्वाची आहे.

आज मुख्यमंत्री पदासाठी अरविंद केजरीवाल यांनी त्यांचे नाव सुचवल्यावर सर्व आमदारांनी एकमुखाने त्यांच्या नावाला सहमती दर्शवली. दरम्यान आज अनेक वर्तमानपत्रानी सुनिता केजरीवाल यांना मुख्यमंत्री केले जाईल आणि आप मध्ये घराणेशाही आहे अशा पद्धतीच्या भाजप च्या आरोपाला भरपूर प्रसिद्धी दिली होती. परंतु तो दावा पूर्णपणे फोल ठरवत आप ने एका उच्च शिक्षित महिलेला दिल्ली सरकारच्या मुख्यमंत्रीपदी नेमण्याचा निर्णय घेतला आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती