सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • आपल्या आतिशी दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री
  • चंद्रकांत दादा यांच्या ताफ्यातील गाडीला मद्यधुंद कार चालकाने दिली धडक.,चंद्रकांत दादा सुखरूप
  • आज सकाळी दगडूशेठ गणपतीची अजित पवार यांचे हस्ते पूजा
  • अमृता फडवणीस यांनी भाऊ रंगारी गणपतीची आरती
 व्यक्ती विशेष

पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला आणखीन एक मोठा धक्का!

डिजिटल पुणे    18-09-2024 14:04:47

पिंपरी चिंचवड : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहेत. अनेक नेतेमंडळी पक्षांतर करताना दिसत आहेत. त्यातच ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला पुण्यात धक्का बसल्याचे बोलले जात आहे.पक्षांतर्गत गटबाजी, घराणेशाही, मनमानीमुळे चिंचवड विधानसभा मतदारंसघातील भाजपमधील गळती थांबायचे नाव घेत नाहीये. पक्षातील घराणेशाही, मनमानीला कंटाळून वाकड़चेच वजनदार नेते माजी नगरसेवक संदीप कस्पटे यांनी सोमवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आपला राजीनामा पाठविला आणि भाजप कायमची सोडचिठ्ठी दिली. 

आता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत वाकडमधील भाजपचे उपाध्यक्ष राम वाकडकर यांनी पक्षाच्या शहर उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या पाठोपाठ अजून १५ नगरसेवक भाजपला सोडचिट्टी देण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

दरम्यान कालच भाजपच्या वाकडमधीलच संदीप कस्पटे यांनी पक्ष नेतृत्वाकडे राजीनामा सोपवला होता, तोच राम वाकडकर यांनीही राजीनामा पाठविल्याने कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. चिंचवड विधानसभेला शंकर जगताप यांना उमेदवारी देण्यास १५ माजी नगरसेवकांचा विरोध आहे. अशाही परिस्थितीत जगताप यांनाच पुन्हा संधी दिली जात असल्याने नाराज मंडळींनी मिळून भाजपला घेरले आहे.

 लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाच्या आदेशानुसार महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचे काम प्रामाणिकपणे केले. चिंचवड पोटनिवडणुकिला अश्विनीताईंना या भागातून लिड द्यायला पुढाकार घेतला. पक्ष वाढीसाठी दहा हजारवर नवमतदार मी नोदवले. आज आमचे वाकड हे आयटीचे गेट आहे, पण रस्त्यांच्या समस्येकडे कोणीही नेत्याने लक्ष दिलेले नाही. आपण पक्षासाठी इतके सगळे काम अहोरात्र करत आलो, पण साधी प्रदेश नेत्यांची ओळखसुध्दा आमचे शहाराध्यक्ष करून देत नाहीत.  अशी खंत राम वाकडकर यांनी यावेळी व्यक्त केली.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती