सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • संजय खन्ना देशाचे नवे सरन्यायाधीश होणार
  • भाजपाची पहिली यादी उद्या जाहीर होणार
 व्यक्ती विशेष

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित साहेब ठाकरे यांनी आज पुणे जिल्ह्य़ातील हडपसर विधानसभा क्षेत्रातील मनविसे पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या जाहीर

डिजिटल पुणे    17-10-2024 15:15:36

पुणे : आगामी विधासभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा पार पडला.पक्षप्रमुख सन्माननीय राजसाहेब ठाकरे ह्यांच्या अध्यक्षीय भाषणाने आज नेस्को मधल्या सभागृहात मनसे नावाचं वादळ विधानसभेच्या पार्श्वभूमीवर नव्या दमाने जागं झालंय.राजसाहेबांच्या आदेशावरून ‘नवा महाराष्ट्र’ घडवण्यासाठी आम्ही सर्व मनसैनिक सज्ज आहोत!

आपण स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जात आहोत. ना युत्या ना आघाड्या लोकांनी आपल्यावर आशा अपेक्षा ठेवल्या आहेत. पहिल्या सभेत सांगितल्याप्रमाणे ‘जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडावा अशी इच्छा आहे, त्यासाठी जनतेने एकदा संधी द्यावी.असे मत राज ठाकरे यांनी बोलताना केले

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री. अमित साहेब ठाकरे यांनी आज पुणे जिल्ह्य़ातील हडपसर विधानसभा क्षेत्रातील मनविसे पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर केल्या आहेत. सर्व नवनियुक्त मनविसे पदाधिकाऱ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि भावी संघटनात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

 

 

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती