सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 व्यक्ती विशेष

मुख्यमंत्रीपदी येताच देवेंद्र फडणवीसांनी घेतला पहिला निर्णय! पुण्यातील 'या' व्यक्तीच्या फाईलवर केली स्वाक्षरी

डिजिटल पुणे    06-12-2024 10:37:38

मुंबई : मुख्यमंत्रीपदाच्या शपथेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर केली आहे. पुण्यातील रुग्णाला त्यांनी 5 लाखांची मदत दिली आहे. पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना 5 लाखाची मदत जाहीर कऱण्यात आली आहे. चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्याची विनंती केली होती. 

सरकार स्थापन होताच राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली आहे. यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला सूचना केल्या आहेत. जनतेच्या अपेक्षांची पूर्ती करण्यासाठी आपल्याला अधिक वेगाने काम करावं लागेल असं त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं आहे. 

शपथविधी होताच राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला सूचना केल्या आणि अधिक गतीने, जोमाने काम करण्यास सांगितलं. जनतेच्या अपेक्षांची पूर्ती करण्यासाठी आपल्याला अधिक वेगाने काम करावं लागेल असं ते अधिकाऱ्यांना म्हणाले. आता गती वाढवू आणि अधिक खोलवर जाऊन चांगले निर्णय घेऊन  शाश्वत विकास कसा साध्य करता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करूयात असंही ते म्हणाले

'हा कसोटी सामना आहे'

"पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत अधिकाऱ्यांना सांगितलं की, मागच्या काळात 50 ओव्हरची मॅच होती. नंतर अजित पवार आले आणि 20 ओव्हरची मॅच झाली. आता कसोटी सामना आहे. त्यामुळे नीट धोऱणात्मक निर्णय घेत राज्याला पुढे न्यायचं आहे. ज्या योजना सुरु केल्या आहेत, पायाभूत सुविधा, नदीजोड प्रकल्प, वेगवेगळे निर्णय पुढे सुरु ठेवायचे आहेत. आमच्या वचननाम्यात, जाहीरनाम्यात जी आश्वासनं दिली आहेत ती पूर्ण कऱण्यासाठी पावलं उचलायची आहेत. दिलेली सर्व आश्वासं पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. एक लोकाभिमुख सरकार, सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारं सरकार पुढेही पाहायला मिळेल. योग्य मार्ग काढत मार्गक्रमण करु असा विश्वास आहे," असं देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. 

'काही गोष्टी डोक्यात आहेत. दोन्ही मित्रांशी चर्चा करणं बाकी आहे. सध्या माझं लक्ष नदीजोड प्रकल्प सुरु झाला यावर आहे. सौरऊर्जेचे प्रकल्प, ज्यामध्ये रोजची डिलिव्हरी सुरु आहे. 2026 पर्यंत 16 हजार मेगाव्हॅटचे प्रकल्प पूर्ण करायचे आहेत. ही शाश्वत विकासाची कामं आहेत. यातील प्रत्येकाचा नीट फॉलो अप करावा लागतो. प्रक्रिया अधिक चांगली करण्याचा प्रयत्न असेल," असंही ते म्हणाले आहेत.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती