मुंबई : महायुतीचे समन्वयक आणि विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. मनीष निकोसे या व्यक्तीने आमदार लाड यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ देखील केली आहे. आमदार प्रसाद लाड यांनी याबाबत पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे. त्यानंतरही आज पुन्हा एकदा धमकी दिली. 2 हजार लोकांसह तुझ्यावर हल्ला करेन, असे धमकीत म्हटलंय. आपण केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या कार्यालयातून बोलतोय, तर कधी आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयातून बोलत असल्याचे हा व्यक्ती सांगत आहे.
भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मनीष निकोसे नावाच्या व्यक्तीने शिवीगाळ करत धमकी दिल्याचा दावा आमदार लाड यांनी केला आहे. या धमकीविरोधात त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
आमदार लाड यांच्या म्हणण्यानुसार, धमकी देणा-याने “2 हजार लोकांसह हल्ला करेन,” असे म्हटले आहे. त्याचबरोबर, या व्यक्तीने कधी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या कार्यालयातून तर कधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयातून बोलत असल्याचा दावा केला, असे आमदार लाड यांनी सांगितले.लाड यांनी पोलिसांकडून धमकी देणा-याची चौकशी करून त्याला त्वरित अटक करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.