सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 व्यक्ती विशेष

आता खरी मजा आहे, हिशोब चुकता करण्याची…”; जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

डिजिटल पुणे    25-12-2024 15:42:11

परभणी : मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची नवी तारीख जाहीर केली आहे. २५ जानेवारीपासून ते अंतरवली सराटीत आमरण उपोषणाला बसणार आहेत. हे सामूहिक आमरण उपोषण असेल असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. मनोज जरांगे पाटील परभणी दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बोलता होते.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, आता खरी मजा आहे, हिशोब चुकता करण्याची वेळ आली आहे. होऊ द्या आता. पहिले हा दुसऱ्यांवर ढकलत होता ना, मी विरोध करत नाही, मी द्या असे म्हणतो. आता कळेल आरक्षण देतो की नाही ते, या शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे.काही लोक म्हणतात की आता पहिलं सरकार आहे, आरक्षण देतील का?, पण आता खरी मजा आहे, हिशोब चुकता करण्याची. होऊ द्या आता. पहिले हा दुसऱ्यांवर ढकलत होता ना, मी विरोध करत नाही, मी द्या म्हणतो. आता कळेल देतो की नाही ते, असं विधान करत मनोज जरांगेंनी पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

तसेच, मराठा आरक्षणाचा विषय संपला की शेतमालाचा भाव आणि धनगर मुस्लिम आरक्षण कसे देत नाहीत हे बघतोच…, असं विधान मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. २ कोटी पेक्षा जास्त मराठे आता आरक्षणात गेलेत. २५ जानेवारीपासून पुन्हा आमरण उपोषण करणार आहे. मी राहू न राहू याची परवा नाही, असंही मनोज जरांगे यांनी सांगितले.

मनोज जरांगे आज परभणी आणि मस्साजोगला जाणार आहेत. मनोज जरांगे परभणीत सूर्यवंशी कुटुंबीयांची तर मस्साजोगमध्ये संतोष देशमुख कुटुंबीयांचीही सांत्वनपर भेट घेणार आहेत. 28 तारखेला बीड जिल्ह्यातील जनतेच्या वतीने मोर्चा ठेवलेला आहे. त्यातसुद्धा बीड जिल्ह्यातील जनतेने सहभागी व्हावे, असं आवाहन मनोज जरांगेंनी केलं आहे. तसंच कोणाचा पण बाप येऊ द्या ते मॅटर मी दबू देत नाही. कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत मी हटणार नाही असंही ते म्हणाले आहेत.

25 जानेवारी 2025 पासून आम्ही अंतरवालीमध्ये आमरण उपोषण सुरू करणार आहोत. 25 जानेवारीच्या आत आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करा, अन्यथा सरकारला भयंकर आंदोलन बघावे लागेल, असा इशारा मनोज जरांगेंनी फडणवीस सरकारला दिलाय. तर 25 जानेवारी रोजी राज्यभरातील मराठ्यांनी अंतरवलीकडे यायचं. मराठ्यांची ताकद पुन्हा एकदा दाखवा. सर्वांनी स्वतः हा मेसेज सोशल मीडियावर पोस्ट करा. हे आंदोलन गरीब मराठ्यांनी हातात घ्यायचे आहे असंही ते म्हणाले आहेत.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती