सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 व्यक्ती विशेष

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का, ३५ नेत्यांचे सामूहिक राजीनामे

डिजिटल पुणे    21-01-2025 15:50:32

मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत.अशातच गळवारी विश्‍वनाथ स्वामी यांच्यासह ३५ जणांनी प्राथमिक सदस्यत्वाचे राजीनामे दिले. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाला हा धक्का मानला जात आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरात ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणा देणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून, मंगळवारी (21 जानेवारी) शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी यांच्यासह ३५ जणांनी प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांसह माजी नगरसेवकांचा समावेश आहे. हे पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना-ठाकरे गटाला गळती लागली आहे. पक्षातील अनेक पदाधिकारी, माजी महापौर, माजी नगरसेवक शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. मराठवाडा विभागाचे सचिव अशोक पटवर्धन यांनी नुकताच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यापूर्वी माजी महापौर नंदकुमार घोडेल, अनिता घोडेल यांनी त्यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित प्रवेश केला होता.

ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या गटबाजीला विरोध करणाऱ्या अधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला होता. त्यानंतर दोघांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी नुकताच मेळावाही घेण्यात आला. यावेळी यापुढे कोणीही शिवसेना सोडणार नाही, असा दावा करण्यात आला.पण आठच दिवसात हा दावा फोल ठरला आहे. मंगळवारी विश्वनाथ स्वामींसह ३५ जणांनी प्राथमिक सदस्यत्वाचे राजीनामे दिले. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाला हा धक्का मानला जात आहे.

यांचा समावेश…

विश्वनाथ स्वामी (शहरप्रमुख), शिव लुंगारे (उपजिल्हाप्रमुख), प्रकाश अत्तरदे (माजी नगरसेवक), साहेबराव घोडके, राजू खरे, सुदाम देहाडे, नागनाथ स्वामी (विभागप्रमुख), रोहिदास पवार (शाखा प्रमुख), प्रकाश हांडे, शिवशंकर स्वामी, मनोहर विखणकर, अजिंक्य देसाई, पंटू जाधव, मनोज नर्बदे, अनंत वराडे, वसंत देशमुख, सुभाष नेमाने, रमेश गल्हाटे, गौतम भारस्कर, विट्ठल सोनवणे, तुकाराम घोडजकर, रवि बनकर, रोहित स्वामी, राहुल पाटील, योगेश चौधरी, बाबू स्वामी, आकाश बिडवे, निखिल पडूळ, चैतन्य जोशी, ऋषिकेश भालेराव, तुषार पाथरीकर, मयुरेश जाधव, रोहन स्वामी, सूर्यकांत मानकापे, आयुष शेंडगे, सर्वज्ञ पोपळे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती