सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 पूर्ण तपशील

प्रथमेशला बायकोचं भारी कौतुक! मुग्धाला मुंबई विद्यापीठाकडून सुवर्ण पदक मिळताच शेअर केली खास पोस्ट

पुजा    08-02-2024 13:55:28

मुंबई : सारेगमप लिटल चॅम्प्समधून मुग्धा वैशंपायन हि महाराष्ट्रातील घराघरांत पोहचली. तिने संगीत क्षेत्रासह वैयक्तिक आयुष्यातही यशस्वी झेप घेतली आहे. विविध ठिकाणी गायन कला सादर करीत असताना मुग्धा वैशंपायन हिने स्वतःच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष न करता भारतीय शास्त्रीय संगीताच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात सर्वाधिक गुण मिळवून मुंबई विद्यापीठाचे सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. मुंबई विद्यापीठाच्या वार्षिक पदवी प्रदान (दीक्षान्त) समारंभात मुग्धा वैशंपायनला हे सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले. 

मागच्या वर्षी मुग्धा वैशंपायन हि सारेगमप लिटल चॅम्प्समधून घराघरांत पोहचलेला प्रथमेश लघाटेसोबत विवाहबंधनात अडकली. लग्न झाल्यापासून हे कपल चांगलेच चर्चेत असते. दोघेही सोशल मीडियावर पोस्ट करत एकमेकांप्रती प्रेम व्यक्त करताना दिसतात. नुकताच प्रथमेशने आपल्या पत्नी मुग्धासाठी खास पोस्ट शेअर करत तिचं कौतुक केलं आहे. प्रथमेशने मुग्धाचा सुवर्ण पदक आणि सर्टिफिकेट स्वीकारतानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्याने मुग्धाचे सुंदर शब्दात कौतुक केले आहे. त्याने असे लिहिले की, 'बायको तुझे खूप खूप अभिनंदन, आम्हाला तुझा अभिमान वाटतो.' या पोस्टमध्ये त्याने लाडक्या बायकोसाठी हार्ट इमोजी देखील पोस्ट केले आहे. सध्या प्रथमेशची ही पोस्ट व्हायरल होत असून चर्चेत आली आहे. 

दरम्यान, मुग्धानं देखील एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं लिहिलं, "मास्टर्स इन क्लासिकल वोकल-गोल्ड मेडल पदवी प्रदान समारंभ मुंबई युनिवर्सिटी येथे आज सकाळी संपन्न झाला. त्यानंतर लगेच मी कारंजाला आले. अगदी आजच्याच दिवशी श्री गुरुमंदिरामध्ये प्रथेप्रमाणे श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांसमोर गायनसेवा दत्त महाराजांनीच करवून घेतली. अजून काय हवं?" 

 गायिका मुग्धा वैशंपायन हिने मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागातून शैक्षणिक वर्ष २०२१-२३ अंतर्गत संगीत अधिस्नातक (एम.एफ.ए) (गायन) हा दोन वर्षीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला आणि सर्वाधिक गुण प्राप्त करीत दिवंगत ‘श्री रंजनकुमार एच. वैद्य’ या सुवर्ण पदकाची मानकरी ठरली. मुग्धाची अंतिम परीक्षा एप्रिल – २०२३ मध्ये पार पडली होती.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती