सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 शहर

पुणे - बंगळुरू महामार्गावर कर्तव्यावर असलेल्या पोलीस अंमलदाराचा भरधाव वाहनाच्या धडकेत मृत्यू

पुजा    16-04-2024 16:12:48

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. ड्युटी संपवून घरी जात असताना एका पोलीस अंमलदाराच्या दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक बसली. यामध्ये गंभीर जखमी होऊन या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झला. सचिन नरुटे (वय ३८, रा. वाकड) असे मृत्यू झालेल्या पोलीस अंमलदाराचे नाव आहे. हा अपघात बंगळुरू – मुंबई महामार्गावर रावेत येथे सोमवारी (दि.१५) रात्री साडेदहाच्या सुमारास झाला. अपघातानंतर वाहन चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.  

याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन नरोटे हे देहुरोड पोलीस ठाण्यात कार्यरत होते. कर्तव्यावर असलेले नरुटे सोमवारी रात्री ड्युटी संपवून साडे दहाच्या सुमारास दुचाकीवरुन वाकड येथे घरी जात होते. त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नरुटे यांच्या मागे पत्नी आणि दोन लहान मुली आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती