सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 पूर्ण तपशील

'ठिपक्यांची रांगोळी' फेम अभिनेता चेतन वढनेरे अडकला विवाहबंधनात ; उखाणा घेत सांगितलं ... ठरलं होतं आधीच'

पुजा    22-04-2024 18:24:19

पुणे : स्टार प्रवाह वरील 'ठिपक्यांची रांगोळी' फेम अभिनेता चेतन वढनेरे विवाहबंधनात अडकला. अभिनेत्री ऋजुता धारपशी त्याने आज म्हणजे २२ एप्रिल २०२४ ला लग्नगाठ बांधली. नातेवाईक आणि मोजके मित्रमंडळी यांच्या उपस्थितीत चेतन आणि ऋजुता यांनी लग्न केलं. सध्या सोशल मीडियावर नुकतेच त्यांनी त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. आणि ते चांगलेच चर्चेत आहेत.  

पुण्यातील साधना राजेशाही या ठिकाणी मराठमोळ्या थाटात त्यांचं लग्न पार पडलं. या खास दिवसासाठी ऋजुताने मोरपंखी रंगाची नऊवार साडी आणि त्यावर जांभळ्या रंगाचा ब्लाउज असा लूक केला होता तर चेतननेही जांभळ्या रंगाचं धोतर, पांढऱ्या रंगाचा सोनेरी कडा असलेला शेला नेसला होता. सप्तपदीसाठी त्यांनी केलेला हा लूक सगळ्यांना खूप आवडला. तर मंगलाष्टकांसाठी ऋजुताने पिवळ्या आणि जांभळ्या रंगाचं कॉम्बिनेशन असलेली नऊवार नेसली होती तर चेतनने पांढरा अंगरखा प्रकारातील कुर्ता, शेला, फेटा आणि पायजमा असा पोशाख केला होता. 

चेतनने यावेळी घेतलेल्या उखाण्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. राजश्री मराठीने त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर चेतनच्या उखाण्याचा व्हिडीओ शेअर केलाय. "ठाण्याचे असतील तलाव फेमस पण नाशिकची आमची नदीच ऋजुताचं नाव घेतो आमचं ठरलं होतं आधीच" असा भन्नाट उखाणा चेतनने घेतला.  या उखाण्याचं कौतुक होतंय. तर "22.04.2024॥ कुर्यात सदा मंगलम् ॥" असं कॅप्शन ऋजुताने तिने शेअर केलेल्या फोटोजना दिल आहे. त्यांच्या सेलिब्रिटी मित्रांनी आणि चाहत्यांनी या फोटोवर कमेंट करत या नवविवाहित जोडीचं अभिनंदन केलं आहे. 

दरम्यान, १९ डिसेंबर २०२२ ला या जोडीने नाशिकमध्ये मित्र-मैत्रीण आणि मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये गुपचूप साखरपुडा उरकला होता. झी युवावरील फुलपाखरू या मालिकेच्या सेटवर या जोडीची ओळख झाली होती. पुढे मैत्री आणि हळूहळू प्रेम असा प्रवास करत या जोडीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. ऋजुता 'आई माझी काळूबाई' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती आणि आता नवीन प्रोजेक्टमध्ये तिला पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती