सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 शहर

पुण्यात रोटरी क्लब पर्वतीचे अध्यक्ष स्वानंद समुद्र लिखित “मनी मॅटर्स” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

डिजिटल पुणे    28-04-2024 14:16:31

पुणे :  रोटरी क्लब पर्वतीचे अध्यक्ष स्वानंद समुद्र लिखित “मनी मॅटर्स”(“Money Matters” Secrets for Building Wealth & Investment Awareness) या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. हे प्रकाशन रोटरी इंटरनॅशनलचे पुढील वर्षाचे अध्यक्ष(भावी) स्टेफनी उर्विक यांच्या शुभहस्ते करण्यात आले. नोवाटेल पुणे येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रोटरी इंटरनॅशनल डायरेक्टर राजू सुब्रमण्यम, रोटरी प्रांत ३१३१ चे भावी प्रांतपाल शितल शहा, सौ शितल शहा, सुप्रिती समुद्र, आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना लेखक स्वानंद समुद्र यांनी संपत्ती व गुंतवणूक कशी करावी याबद्दल बहुमोल माहिती सर्वांना मिळावी, याबद्दल जनजागृती साठी हे पुस्तक लिहिल्याचे नमूद केले.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती