सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 व्यक्ती विशेष

यापुर्वी देखील कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळाली असती तर माझं काम दाखवलं असतं; अशी खंत सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली

डिजिटल पुणे    29-04-2024 15:07:05

पुणे :  गेली २५ वर्षापासून ग्रामपंचायतपासून ते जिल्हा परिषद, टेक्सटाईल, विद्या प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून समाजकारणामध्ये काम करीत आहे. यासाठी मला विविध ठिकाणी पुरस्कार देखील मिळाले आहेत. पर्यावरणासाठी देखील याआधी काम केले आहे अन् पुढेही करत राहणार आहे. त्यामुळे माझा प्रवास हा लोकसहभागातून लोकसभेकडे जाणार आहे. त्यामुळे लोकांचे प्रश्न सोडवणे माझी पहिली पसंती आहे.  यातच यापुर्वी देखील कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळाली असती तर माझं काम दाखवलं असतं. अशी खंत व्यक्त करत बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी बारामतीत आपलाच विजय होणार असा विश्वास दाखल केला. 

माझ्या मतदारसंघात एव्हाना संपुर्ण राज्यात शेतकरी आणि शेतीच्या संबंधित अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. माझ्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात देखील तरूणांच्या हाताला रोजगार नाही. महिला सक्षणीकरणाचा देखील मोठा प्रश्न उभा राहिला आहे. हे सर्व करत असतांना पर्यावरण देखील तितकचं महत्वाचं आहे. ट्रॅपिकचा देखील मोठा प्रश्न आहे. त्यामुळे येत्या पाच वर्षात या सगळ्या गोष्टींकडे माझा कल असून संधी मिळाली तर ते पुर्ण करण्याचा माझा प्रयत्न असणार असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय. 

गेल्या २५ वर्षांमध्ये विधानसभा असो किंवा लोकसभेच्या निमित्ताने वेगवेगळ्या उमेदवारांसाठी प्रचार केलाय. आता प्रत्यक्ष स्वत:चा प्रचार करत असताना एक जबाबदारीची जाणीव आहे. प्रचाराच्या वेळी लोकांच्या गाठीभेटी घेत असतांना त्यांच्या आपल्याकडून अपेक्षा आहेत. त्या पुर्ण करण्यासाठी आपण बांधील आहोत. त्यापेक्षा त्यांच्याकडून पुर्ण हव्यात हे आपली जबाबदारी असते अन् त्यांना ते आश्वासित करण्याचा माझ्याकडून प्रयत्न केला जात असल्याचेही त्या म्हणाल्या. 

राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर तुम्हाला आणि अजित पवारांना एकटं पाडलं गेलं आहे. त्यावर बोलतांना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, सुरूवातीपासून सांगत आली आहे की माझी निवड ही जनतेने केली आहे. त्यामुळे मी जनतेलाच माझं कुटुंब मानलं आहे.  त्यामुळे असं काही नाही की ाम्हाला एकटं पाडलं गेलं वगैरे. माझी कुटुंबाबातचीही संकल्पना हीच आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती