सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 पूर्ण तपशील

गोष्ट आमच्या लग्नाची; सौ. जयश्री बाळासाहेब कुलकर्णी, नातेसंबंधातुन होती ओळख त्यामुळेच 'वैवाहिक जीवनाची आम्हांस मिळाली सोबत

डिजिटल पुणे    29-04-2024 16:06:28

दि.8/3/2024 रोजी महिला दिनाच्या निमितानं साजरी होणारी सौ. जयश्री & बाळासाहेब यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचीः- योगायोग म्हणावा का आहे माझे भाग्य काय सांगु बाई गोष्ट आमच्या लग्नाची, नातेसंबंधातुन होती ओळख त्यामुळेच 'वैवाहिक जीवनाची आम्हांस मिळाली सोबत

दि. 08/03/1982 रोजी सुरुवात झाली. लहानवयाचे ते अल्लडपण तरीही नकळत वयात असुनही समजावुन घेऊनी केले संगोपण हेच आहे माझ्या बाळासाहेबांचे मोठेपण त्यांचे साठी केले मी जिवन समर्पण या सहजीवनात संसारवेली वरती बहरले चार प्रेमाचे अंकुर यांच्या पावलांनी आयुष्य बदलत गेले. पुढे आसाच माझ्या अंकुरांचा संसार फुलत गेला. त्यांच्या संसारवेलीवरती फुललेल्या अंकुराने आजी आजोबा या नविन नात्याची नविन सुरुवात झाली. मान सन्मान मिळत गेला. जिवनाचा सार्थपुर्ण झाल्याचा अभिमान आणि असा आमचा आजपर्यंत चा वैवाहीक संसारवेलीचा सहवास, कधीच संपवुच नये असा वाटणारा. आमचा सुखी संसाराचा प्रवास... असाच सुरु रहावा. यात सर्व गोष्टी सांभाळत असताना समाजाचे आपणही काही देणे लागते. याची जाणीव ठेवुन समाजकार्यातही सेवा जमेल तशी निश्चितच करण्याचा मनोभावे प्रयत्न करीत असते. आणि भविष्यातही करीत राहणार यात मात्र कोणतीही शंका नाही. या समाजामध्ये वावरत असताना आज मी भारतीय जनता पक्ष या राजकीय पक्षात मागील 5 वर्षापासुन शहर सरचिटणीस या पदावर कार्य करित आहे. असा हा माझ्या जिवनाचा सारांश गोष्ट आमच्या लग्नाची या छोटयाशा निबंधातुन व्यक्त केली.

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती