सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 व्यक्ती विशेष

महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचे विधानसभा मतदारसंघात पारडे जड; परंतु या मतदारसंघात अत्यल्प मतदान झाल्यास त्यांना पराभवाला सामोरे जावे लागेल, असे मत प्राब संस्थेने दिले

MSK    29-04-2024 17:42:36

बारामती : महाराष्ट्रामध्ये सत्तांतर, राजकीय पक्षांची फाटाफूट आणि बंडखोरी पक्ष विभाजन घडामोडींमुळे काही प्रमाणात मतदारांमध्ये राजकीय पक्षांबद्दल घृणास्पद द्वेषाची तसेच अविश्वासहार्य भावना निर्माण झालेली असल्याने मतदानामध्ये निरुत्साह दिसून येत आहे. महाराष्ट्रामधील 48 लोकसभा मतदारसंघातील पहिल्या व दुसऱ्या टप्यात 13 लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले आहे यामध्ये सर्वाधिक कमी मतदान झालेले आहे. तिसऱ्या व चौथ्या टप्यातही कमी मतदानाचे प्रमाण राहिल्यास त्याचा फटका उमेदवारांना निश्चित बसणार आहे. 

महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवारांच्या अटीतटीच्या लढतीत राजकीय सद्यस्थितीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचे समाविष्ट 6 पैकी 5 विधानसभा मतदारसंघात पारडे जड आहे परंतु या मतदारसंघात अत्यल्प मतदान झाल्यास त्यांना पराभवाला सामोरे जावे लागेल अशी स्थिती निर्माण झालेली अभियानातून दिसून येत आहे. कमी मतदानाच्या टक्केवारीचा सर्वाधिक फटका महायुतीच्या उमेदवारांना बसणार असून मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न केले नाही तर पराभव अटळ असेल अशी राजकीय सद्यस्थिती आहे. 

बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार व विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांचे स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते राजकीयदृष्ट्या हायजॅक होत असून पोलिंग व बुथ व्यवस्थेतील नियोजित कार्यकर्ते यादीत वारंवार बदल करावा लागत असल्याच्या स्थितीचा फटका या निवडणुकीत त्यांना बसण्याची शक्यता आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील समाविष्ट 6 विधानसभा मतदारसंघा पैकी 5 विधानसभा मतदारसंघात त्यांना कसरत करावी लागत आहे. विस्तृतपणे अहवालासाठी प्राब संस्थेकडे संपर्क साधावा.

बारामती लोकसभा मतदारसंघातील समाविष्ट सहा विधानसभा मतदारसंघापैकी २ विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे आमदार आहेत त्यांच्यावर देखील अजित पवार यांचा प्रभाव आहे. इंदापूर वगळता अन्य दौंड, खडकवासला या ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघात स्वतः अजित पवार नेतृत्व करीत आहेत या ठिकाणी जरी लोकसभेला विद्यमान खासदार सुप्रियाताई पवार यांना मतदारांनी साथ दिली तरी अन्य इंदापूर, दौंड, पुरंधर, भोर, खडकवासला या मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या स्थानिक पातळीवरील संघटनात्मक पदाधिकारी यांच्यावर अजित पवार यांचा प्रभाव आहे. 

2019 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवारावर मात करून विद्यमान खासदार राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी 1 लाख 55 हजार 774 इतके मताधिक्य मिळवलेले होते. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणार्‍या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप या पक्षांचे प्रत्येकी 2 आमदार विधानसभा मतदारसंघात लोकप्रतिनिधित्व करीत आहेत. बारामती मतदारसंघ हा शरद पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पूर्वीचे शिरूर, चिंचवड, हडपसर हे मतदारसंघ बारामतीत समाविष्ट होते. मात्र पुनर्रचना झाल्यानंतर 3 विधानसभा मतदारसंघात बदल झाले.

 हडपसर शिरूर लोकसभेला जोडून खडकवासला हा नवीन मतदारसंघ अनुकुलता म्हणून आग्रहाने जोडून घेतला मात्र तो मतदारसंघच राष्ट्रवादीला दिवसेंदिवस डोकेदुखीचा  ठरत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला मिळणारी मते व विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला मिळणार मते तुलनात्मकदृष्ट्या लोकसभा निवडणुकीत कमी पडतात ही खरी वस्तूस्थिती नाकारता येणार नाही. पक्षांतर्गत गटबाजीमुळे राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीत अल्प मतांनी पराभवाला सामोरे जावे लागत आहे. त्याचा थेट फटका लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला बसतो. परंतु बदलत्या राजकीय परिस्थितीत सर्वच समीकरण बदलली आहेत. राष्ट्रवादी पक्षाचे विभाजन आणि एका गटाला भाजप प्रणीत युतीची साथ यामुळे स्थानिक पातळींवरील राजकीय स्थितीत वारंवारता बदल होत आहेत.

राष्ट्रवादी पक्षातील विभाजनानंतर प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष विभागला आहे. पक्ष विभागण्यापूर्वी लोकसभा मतदारसंघातील समाविष्ट 6 विधानसभा मतदारसंघातील काही प्रभावित लोकप्रतिनिधींना सातत्याने डावलल्याने विरोधात राहिले मात्र तब्बल 20 ते 50 वर्षांनी त्यांची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनधरणी करण्याचा प्रयत्न झाला त्याचा काहीही लाभ या निवडणुकीत प्राप्त होणार नाही अशी स्थिती आहे. 

पुणे जिल्ह्यातील 4 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची अंतिम यादी आज निश्चित झालेली असून लढती स्पष्ट झालेल्या आहेत. महाराष्ट्रामधील 48 लोकसभा मतदारसंघातील पहिल्या व दुसऱ्या टप्यात 13 लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले आहे यामध्ये सर्वाधिक कमी मतदान झालेले आहे. मतदारांमध्ये मतदान करण्यास निरुत्साह दिसून आला. कमी मतदानाच्या टक्केवारीचा फटका कोणत्या उमेदवारांना बसणार हे गणित स्थानिक पातळीवरील राजकीय स्थिती वरून व कोणत्या विचारसरणीच्या मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली त्यावरून स्पष्ट होते.  

पुणे शहर वगळता बारामती आणि मावळ मध्ये महायुतीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आहेत तर त्यांचे निवडणूक चिन्ह घड्याळ आहे या ठिकाणी भाजपचे कमळ हे चिन्ह मतपत्रिकेवर नाही. तर मावळ मतदारसंघात शिवसेनेचे धन्युष्यबाण निवडणूक चिन्ह कायम आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपला मानणारे मतदार चिन्हांकित उमेदवार नसल्याने मतदानाकडे दुर्लक्षित झाल्यास त्याचा मोठा फटका महायुतीच्या उमेदवारांना बसणार हे मात्र निश्चित आहे. त्यामुळे जास्तीतजास्त मतदान करून घेण्यावरच यशापयशाचे गणित अवलंबून आहे. 

"शिरूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांचे पारडे जड" अधिक माहितीसाठी प्राब संस्थेशी संपर्क साधावा.

2024 च्या लोकसभा निवडणुकीने एक तृतीयांश मार्ग व्यापला आहे. एकूण 543 जागांपैकी 190 जागांवर मतदान झाले आहे. 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात 102 जागांवर मतदान झाले होते. यामधील सरासरी मतदान 65.5% होते, जे 2019 मधील या जागांवर झालेल्या सरासरी मतदानापेक्षा 4.4% कमी आहे. त्याच वेळी, 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात 88 जागांवर 61% मतदान झाले, जे 2019 च्या तुलनेत 7% कमी आहे. यावेळी दोन्ही टप्प्यात मतदान कमी होण्याचा कल स्पष्टपणे दिसत आहे.

चंद्रकांत भुजबळ 

पॅालीटीकल रिसर्च अॅण्ड ॲनालासेस ब्युरो ( प्राब) पुणे


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती