सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 पूर्ण तपशील

गोष्ट आमच्या लग्नाची; संसार संसार आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर, चारुशीला अमोल खोत

डिजिटल पुणे    03-05-2024 17:06:13

रोजच्या धकाधकीच्या जीवनात मान वर करून पहायला वेळ नसतो, फोन आला तर मोबाईल कानाला लावून एका हाताने काम करतच बोलायचे निवांतपणा असा काही नाही.  पण जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेमुळे मनभुत काळात गेले, पंधरा वर्षांपूर्वीचे दिवस मनात मोर पिसासारखे तरळले.  ते दिवस पटकन नजरे समोर आले. 

माझे लग्न सुद्धा चारचौघिन सारखी कांदे पोहे देऊनच ठरले.  वडील इंजिनियर असल्यामुळे आईची इच्छा जावई इंजिनिअर असावा पण तसे झाले नाही. म्हणतात ना लग्नाची जोडी स्वर्गात बांधली जाते. वडील म्हणाले लग्न म्हणजे दोन जीव दोन कुटुंब एकत्र येणे एकमेकांना अनुरूप असणे आवश्यक असतं. माझी इच्छा होती मुलगा पुण्यात राहणारा असावा त्याप्रमाणे मला पुण्यातील स्थळ आले वडिलांनी हौसेने सर्व रीती रिवाजाप्रमाणे लग्न करून दिले, लग्नात आई-वडिलांच्या डोळ्यात अश्रू, एका डोळ्यात आनंद मुलगी तिच्या घरी सुखी राहू दे व दुसऱ्या डोळ्यात दुःख ती आपल्यापासून दूर जाणार पण त्यावेळी आपण नवऱ्याच्या घरी जाणार म्हणून आनंदी असतो. आईने सांगितले सासू-सासर्‍यांची सेवा करायची तेच तुझे आई-वडील आहेत. संसार म्हटले की चढ-उतार हे असणारच प्रत्येक प्रसंगाला धीराने तोंड देणे अरे संसार संसार आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर हे खरंच बहिणाबाईंचे गाणे प्रत्येकाला पटते.

मला आता एक मुलगी व एक मुलगा आहे. एकट्या नवऱ्याच्या कमाईवर घर चालत नाही म्हणून मी स्वतःहून संसाराला हातभार लावण्यासाठी नोकरी करू लागले. खरे तर स्त्री ही दोन्ही ठिकाणी परकी असते कारण लग्न झाल्यावर नंतर आई-वडील सांगतात आता हे घर तुझे नाही व त्यानंतर दुसऱ्याच्या घरात ती बाहेरून आलेली असते. पण तरीही त्या परक्या घराला ती आपलं मानते कारण निसर्गतच स्त्री ही स्ट्रॉंग आहे. मुलाला जन्म देणे त्याचे संगोपन करणे शिवाय घर संभाळणे आणि नोकरी बापरे उसंत घ्यायला तरी वेळ आहे का ,?

पण स्त्री हे सगळं हौसेने करत असते. कारण तिच्या अंतर्मनात स्ट्रॉंगनेस बरोबर जिव्हाळी निसर्गानेच बनविला आहे. नोकरी करून मुलांना सांभाळून मुलांना मार्गी लावणे हेच माझे कर्तव्य असे मी समजते. कितीही संकटे आली तरी संसाराचा भार खांद्यावर घेऊन रोज नव्या जोमाने उभे राहणे हीच आहे स्त्री शक्ती कारण कोणतेही करताना स्त्री कुटुंबाची जबाबदारी विसरत नाही.

 

 

 

 

 

 

 

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती