सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 व्यक्ती विशेष

आरक्षणाबाबत राहुल गांधींची सर्वात मोठी घोषणा; पहा नेमकं काय म्हणाले??

डिजिटल पुणे    04-05-2024 10:22:59

पुणे :  लोकसभा निवडणूक २०२४ च्या निमित्ताने काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पुण्यात भव्य अशी सभा पार पडली. या सभेत राहुल गांधींनी आरक्षणाबाबत मोठी घोषणा करत मतदाराना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. लोकसभेच्या निकालानंतर जर देशात इंडिया आघाडीचे सरकार आलं तर आरक्षणाची असलेली ५० टक्के मर्यादा हटविण्यात येईल. दलित १५ टक्के, अदिवासी ८ टक्के आणि मराठा, धनगर यांच्यासह मागास वर्गास ५० टक्के, असे एकूण ७३ टक्के आरक्षण दिले जाईल, अशी घोषणा राहुल गांधी यांनी केली. तसेच आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं आश्वासनही त्यांनी दिले.

महाराष्ट्रात आरक्षणाचा मुद्दा हा गेल्या काही महिन्यांपासून चांगलाच पेटला आहे. हाच धागा पकडत राहुल गांधींनी आरक्षणावरून मोदींवर निशाणा साधला. राहुल गांधी म्हणाले कि, मोदींनी फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्यावं, त्यांनी कुठेही सांगावं की, ते 50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवून टाकणार. त्यांनी कुठेही जावून सांगावं. मात्र आम्ही निर्णय घेतला आहे की, निवडणुकीनंतर आम्ही 50 टक्के आरक्षणाची मर्यादा तोडून टाकू. देशात 15 टक्के दलित लोकसंख्या आहे, 8 टक्के आदिवासी आहेत, जवळपास 50 टक्के मागास वर्गाची लोकसंख्या आहे. या तिघांची एकूण टक्केवारी ही 73 टक्के आहे. जनतेला सर्व माहिती आहे असं देखील राहुल गांधी यावेळी म्हणाले.

नरेंद्र मोदी आणि भाजपला संविधान मिटवायचे आहे, असा गंभीर आरोपही राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात केला. आमची लढाई ही संविधान वाचविण्याची आहे. संविधान संपविले जाईल, त्यादिवशी तुम्ही भारत देशाला ओळखू शकणार नाही. . हे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलं आहे. या संविधानात महात्मा फुले यांचे विचार आहेत. मात्र याच संविधानाला नरेंद्र मोदी आणि भाजप बदलण्यासाठी इच्छुक आहेत मात्र आम्ही असं होऊ देणार नाही अशी ग्वाही राहुल गांधी यांनी दिली.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती