सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 व्यक्ती विशेष

लोकसभेच्या बारामती मतदार संघातील गावांना निधी कमी पडू न देता विकास रखडलेल्या या भागाचा विकास करणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डिजिटल पुणे    04-05-2024 11:01:55

फुरसुंगी : राज्यातील तिसऱ्या टप्यात मतदान होत असलेल्या मतदारसंघात अवघे काही दिवस प्रचारासाठी उरले आहेत. देशाचे लक्ष लागलेल्या बारामती मध्ये तिसऱ्या टप्यात मतदान होणार आहे.  लोकसभेच्या बारामती मतदार संघातील गावांना निधी कमी पडू न देता विकास रखडलेल्या या भागाचा विकास करणार आहे. असे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फुरसुंगीमध्ये झालेल्या प्रचारसभेत बोलताना सांगितले. 

बारामती लोकसभा मतदार संघातील फुरसुंगी भेकराईनगर येथे महायुतीचे उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सभेचे आयोजन केले होते. याप्रसंगी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार, माजी मंत्री विजय शिवतारे, भाजप जिल्हा अध्यक्ष वासुदेव  काळे, माजी आमदार अशोक टेकवडे, पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जालिंदर कामठे, प्रा. दिगंबर दुर्गाडे, मंगलदास बांदल, माजी नगरसेवक गणेश ढोरे, संदीप हरपळे आदी उपस्थित होते.

महापालिकेत समाविष्ट होऊन देखील या भागाचा आवश्यक विकास झाला नाही. येथील मिळकत कर ज्या प्रमाणात सुविधा मिळतील त्याच प्रमाणात आकारण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असे फडणवीस यांनी सभेत बोलताना सांगितले. कांचन कुल याना दिलेले साडे पाच हजारांचे लीड हे डबल करून सुनेत्रा पवार यांना येथील जनता नाक्किच निवडून असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. 

विजय शिवतारे म्हणाले, येथील पाणीप्रश्न देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मार्गी लावला. सुप्रिया सुळे यांनी एका रुपयाचे देखील काम केले नाही. ही निवडणूक भावकीची नसून देशाची आहे त्यामुळे अजित दादा जो शब्द देतील तो आम्ही सर्वजण पूर्ण करू.

सुनेत्रा पवार म्हणाल्या की , महायुतीचे एक मजबूत संघटन निर्माण झाले आहे. देशाच्या विकासासाठी आपल्याला नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचा आहे. यासाठी फुरसुंगी - उरळी देवाची च्या मतदारांनी मला भरघोस मातांनी निवडून द्यावे, ही विनंती.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती