सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 पूर्ण तपशील

गोष्ट आमच्या लग्नाची; सुलोचना लोखंडे, यांनी सांगितली लग्नाची 55 वर्षांपूर्वीची आगळीवेगळी गोष्ट

पुजा    04-05-2024 11:13:45

खरं म्हणजे आमच्या लग्नाची गोष्ट ही आगळीवेगळीच म्हणावी लागेल. 55 वर्षांपूर्वी सन 1969 ची गोष्ट मी नुकतीच बीए करून माझ्या आजोबांच्या गावाला (वनोजा) शिवाजी विद्यालय मध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत होते. माझे वडील कारंजा येथे प्रायमरी शाळेमध्ये मुख्याध्यापक होते. त्यामुळे आई-वडील व आम्ही मूल कारंजा येथे राहत होतो. माझे शिक्षण सुद्धा तेथील कॉलेजमध्ये झाले. माझं लग्न आते भाऊशी कसे झाले हीच खरी लग्नाची गोष्ट ठरेल. माझ्या आत्याला दोन मुलगी व एक मुलगी होती. आत्या अठरा वर्षापासून माहेरी म्हणजे आजोबाकडे वनोजा राहत होत्या. मोठा मुलगा म्हणजे यजमान. आत्याचे यजमान सदन शेतकरी व राजकारणात होते. त्यांनी दुसरे लग्न केल्यामुळे आजोबांनी आत्याला सासरी पाठवले नाही. आत्याबरोबर माझे दीर नणंद माहेरी आले.  व मोठा मुलगा म्हणजे माझी यजमान वडिलांजवळ शाळेच्या कारणांमुळे दुसऱ्या आईच्या कुटुंबात राहत होते. त्यांना त्यांच्या वडिलांनी आईपासून दूर कायम दूर ठेवले. अशी त्यांची ताटतूट  होऊन पंधरा वर्षानंतर त्यांची भेट झाली. त्यामुळे आमच्या कुटुंबाचा व यजमानांच्या कुटुंबांचा वडिलांशी काही संबंध नव्हता. त्यांच्या वडिलांनी जाणीवपूर्वक ठेवला नव्हता, त्यामुळे त्यांचा मोठा मुलावर पूर्ण हक्क आहे असे त्यांचे म्हणणे होते.

माझी सुद्धा एका नातेवाईकाच्या लग्नात माझ्या यजमान अशी तोंड ओळख करून देण्यात आली. त्यानंतर मी तर ही गोष्ट पूर्ण विसरून गेले होते. जेव्हा यांच्या लग्नाच्या मुलीबद्दल विचार सुरू झाला.  तेव्हा त्यांनी एक क्रांतिकारक निर्णय घेतला. त्यांनीही ताटतूट  संपवून सर्वांनी एकत्र आणावयाचे होते. त्यासाठी त्यांनी दोन जवळचे मित्र व दोन नातेवाईक यांच्याशी चर्चा करून मी म्हणजे मामे बहिणीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी वडिलांशी वाद विवाद करून आई-बहीण व भाऊ यांना जवळ बोलून कुटुंब एकत्र करा असा आग्रह धरला. परंतु वडिलांना हे हेकेरवार स्वभावाने ते ऐकण्यास तयार नव्हते. इकडे माझे लग्न एका प्राध्यापक मुलाबरोबर ठरले.  व आते बहिणीसाठी पाहणे सुरू होते, कारण वडिलांना दोन्ही लग्न एकत्र करावयाचे होते. 

माझे यजमानाने धाडसी निर्णय घेऊन त्याप्रमाणे पाऊल उचलणे सुरू केले. त्यांनी दोन मित्राबरोबर येऊन माझे आजोबा वडिलांशी संपर्क केला. व मागचे सर्व विसरून ही ताटातूट संपवण्यासाठी तुमच्या मुलीशी लग्न करवायचे आहे. तरी तुम्ही संमती द्या विचारांची भाच्याचा आग्रह व  आत्या बहिण तसेच तिच्या मुलांच्या भविष्यासाठी वडिलांनी तयारी दर्शवले. याचे चांगले विचार व एकत्रिकरण करण्याचे हेतू आवडला पण त्यासाठी काय खडतर जीवन जगावे लागेल याचा अंदाज कमी वयामुळे नव्हता.

वडिलांची परवानगी मिळवण्यासाठी ऑटोकाठ प्रयत्न केले.  दुसऱ्या आईच्या मुलांशी पाच मुले जबाबदारी घेऊन असे सांगून ही काय ही फायदा झाला नाही. शेवटी आजी वडील व कुटुंब कुणीही लग्नाला आले नाही. आत्या बहिणीचे व आमचे लग्न माझे वडिलांनी साध्या पद्धतीने करून दिले. 

लग्नानंतर आम्ही दोघांनी यांच्या वडिलांकडे गौरी गणपतीच्या निमित्ताने जाण्याचे ठरविले. तिथे गेल्यावर काय होईल हे सांगता येत नव्हते. पण गेल्यानंतर आजी भावनिक झाले, व वडिलांनी चुकीचं केलं म्हणून समज दिली. गावातील लोकांनी व मित्रमंडळींनी याची बाजू योग्य ठरवून तारीफ केली. तसे सासरची परिस्थिती राजकारणात व उद्योगात घसरण झाल्याने नाजूक झाली होती. तिकडील भावंडांना व आजीला यांनी आमच्या जवळ बोलावून घेतले.  आई व भाऊ सुद्धा मिळून एकत्र परिवाराची जबाबदारी सुरू झाली.  भावांचे शिक्षण व नोकरी तसेच लग्नापर्यंत सर्व जबाबदारी व बहिणीचे लग्न माहेरपण वगैरे करतोय म्हणून पार पडले.  आम्हाला तीन मुलं झाली दोन मुलानंतर माझे बी.एड पूर्ण झाले.  यानंतर मोठा परिवार व मुलांचे भविष्य यामुळे मला दोघांनी मिळून नोकरी सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला.  1975 माझं समजूतदार स्वभाव व सर्वांना सांभाळून घेण्याची वृत्ती यामुळे माझ्या बद्दलचा राग हळूहळू निवळलं, परंतु माझ्या माहेर व आत्या बद्दलचा राग व तेढ शेवटपर्यंत वडिलांची कायम होती.  पुढच्या पिढ्याने मात्र संबंध चांगले ठेवले हे सर्व करताना शारीरिक मानसिक व आर्थिक ओढताण होत होती. आमचे राहणीमान साधे होते मुलांनी सुद्धा कधीच अवाजावी हट्ट केला नाही.  तोपर्यंत पन्नाशीच आली.  शिक्षण विसरले पण वाचन विचार कायम ठेवले. 

नातेवाईकांमध्ये जास्तच अडकत न चाललेले पाहून मुलांनी पुण्याला बदली करण्याचा आग्रह धरला. पुण्यात आलो नवीन जीवन सुरू झाले मागील बरे वाईट अनुभव गाठीशी होते त्यातून बरेच शिकायला मिळाले.  कर्तव्य पुरतीचे समाधान होते आज सर्व बहिण भावंडे कार्यप्रसंग मध्ये एकत्र येतात.  एकमेकांच्या घरी जातात हीच आमची यशस्वी बाजू अशाप्रकारे चाकोरी बाह्य आगळीवेगळी लग्नाची गोष्ट पूर्ण झाली 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती