सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 व्यक्ती विशेष

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन मतदान केंद्रांवर आवश्यक उपाययोजना करण्याची सुहास दिवसे यांना केली विनंती

डिजिटल पुणे    05-05-2024 10:19:52

पुणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी मतदान प्रक्रिया सुरू असून पुण्यातील बारामती लोकसभा मतदारसंघात ७ जानेवारी तर पुणे, शिरुर, मावळ लोकसभा मतदारसंघात १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या चारही लोकसभा मतदारसंघात उन्हाची तीव्रता अधिक असून, तापमान सरासरी ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. राज्यातील वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघात वेगवेगळ्या टप्प्यांतील आकडेवारी वरुन उन्हाच्या तीव्रतेमुळे मतदार मतदानासाठी बाहेर पडण्यास उदासिनता दिसून येत आहे.

चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, या चारही लोकसभा मतदारसंघात उन्हाची तीव्रता अधिक असून, तापमानाची तीव्रता ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. दरम्यान, उष्ण तापमानामुळे मतदानासाठी बाहेर पडण्यास मतदारांमध्ये नाराजीचा सूर दिसून येतो. या पार्श्वभूमीवर पुण्यात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन मतदान केंद्रांवर आवश्यक उपाययोजना करण्याची विनंती आज सुहास दिवसे यांना निवेदनाद्वारे केली.

या निवेदनात प्रामुख्याने प्रत्येक मतदान केंद्रांवर त्या पार्श्वभूमीवर पुण्यात मतदानाचा टक्का वाढावा; यासाठी निवडणूक आयोगाने आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी विनंती आ. पाटील यांनी निवेदनाद्वारे केली. यात प्रामुख्याने प्रत्येक मतदान केंद्रांवर मंडप आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, मतदान केंद्रांवर वैयकीय पथक तैनात करणे, दिव्यांगांसाठी व्हिलचेअरची व्यवस्था करावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

तसेच, निवडणूक आयोगाने दिव्यांग आणि 85 पेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना घरी मतदानाचा अधिकार दिला आहे. मात्र, अनेक ठिकाणी यासाठी आवश्यक प्रक्रिया योग्य पद्धतीने न राबविण्यात आल्याने, ते मतदानापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे त्यासाठी आवश्यक उपाययोजना करुन मतदान करुन घ्यावे.त्यासोबतच अनेकदा मतदारांना त्यांची नावे वगळण्यात मतदारयादीतून आल्याची माहिती मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर मिळते. त्यामुळे त्यांच्यात निवडणूक प्रक्रियेसंदर्भात रोष निर्माण होतो. त्यामुळे आयोगाने याचे वेळीच सविस्तर स्पष्टीकरण करावे, आदी आशयाचे निवेदन चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी सुहास दिवसे यांना दिले. यावेळी भाजपा लोकसभा निवडणूक प्रभारी दिपक पोटे हे देखील उपस्थित होते.यावेळी  चंद्रकांत पाटील यांची  निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसोबत वरील सर्व विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती