सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 राज्य

पुणे लोकसभा मतदारसंघ भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (ए), मनसे, रासप, लोकजनशक्ती महायुती संकल्पपत्र विकसित भारत... विकसित पुणे!: मुरलीधर मोहोळ

MSK    08-05-2024 19:46:33

पुणे लोकसभा मतदारसंघ
भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (ए), मनसे, रासप, लोकजनशक्ती महायुती
संकल्पपत्र

विकसित भारत... विकसित पुणे!: मुरलीधर मोहोळ 

भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (ए), मनसे, रासप, लोकजनशक्ती महायुतीचे अधिकृत उमेदवार

 

विचार पुण्याचा... दीर्घकालीन हिताचा!

सर्व दिशांना विकसित होणारे पुणे आता कॉस्मोपॉलिटन झाले आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून पुणे महापालिका आता मुंबईला मागे टाकून राज्यातील क्रमांक एकची बनली आहे. देशभरातील नागरिक पुण्यात स्थिरावत आहेत. हा बदल स्वीकारत असतानाच पुण्याचा ऐतिहासिक बाज टिकून राहिला पाहिजे. ‘पुणेरी’पणाला धक्का लागता कामा नये, ही पुणेकरांची भावना आहे. पुण्याचे पर्यावरण, पुण्याची हवा टिकली पाहिजे. सार्वजनिक वाहतूक सुधारली पाहिजे. मुळा-मुठा नद्यांच्या किनाऱ्यावरून संध्याकाळी सूर्यास्त पाहता यायला हवा. शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात नव्या संधी निर्माण झाल्या पाहिजेत. उद्योग-रोजगार वाढले पाहिजेत. व्यापारी-दुकानदारांचे व्यवहार सुलभ झाले पाहिजेत... अशा अनेक अपेक्षा आहेत. या सगळ्याच्या तळाशी काय आहे, तर आपले पुणे अधिक सुंदर झाले पाहिजे. भारतीय जनता पार्टीचे व्हिजन आणि पुणेकरांनी केलेल्या सूचना, याचे सार या संकल्पपत्रातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.  

- धीरज घाटे, शहराध्यक्ष,  भाजपा- मुरलीधर मोहोळ अधिकृत उमेदवार, महायुती, पुणे लोकसभा मतदारसंघचंद्रकांतदादा पाटील l मेधा कुलकर्णी l नीलम गोऱ्हे l माधुरी मिसाळ l भिमराव तापकीर ,सुनील कांबळे l सिद्धार्थ शिरोळे l सुनील टिंगरे l चेतन तुपे l राजेश पांडे  l जगदीश मुळीक l हेमंत रासने l गणेश बिडकर l योगेश टिळेकर l श्रीनाथ भिमाले l दीपक मानकर l नाना भानगिरे l  साईनाथ बाबर l बाबू वागसकर l संजय आल्हाट l भरत लगड l शैलेश चव्हाण l सचिन खरात संजय सोनवणे

- केंद्राच्या निधीतून ‘पीएमपीएमएल’च्या ताफ्यातील इलेक्ट्रिक बसेसची संख्या २०३० पर्यंत ३,००० वर नेणार

- ‘हरित आच्छादना’चा समतोल राखणारे नियोजन करणार

- पुणे मेट्रो प्रकल्पाचा विस्तार करून मेट्रोचे जाळे १५० किलोमीटरपर्यंत वाढविण्यासाठी पाठपुरावा करणार 

- मेट्रोचा वापर वाढविण्यासाठी लास्ट माईल कनेक्टिव्हिटी मजबूत करणार

- पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जोरकस पाठपुरावा करणार

- पुण्यातील प्रधानमंत्री आवास योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्याला प्राधान्य देणार 

- महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर ही पुण्याची ओळख कायम ठेवण्यास प्राधान्य देणार

- शहरातील वाहतुकीवरचा ताण कमी करण्यासाठी १७० किलोमीटर आणि ११० मीटरचा रिंग रोड प्रगतिपथावर आहे. तो पूर्णत्वास जाण्यासाठी पाठपुरावा करणार

- पुण्यात जीएसटी न्यायाधिकरण स्थापन करण्यासाठी दिल्ली दरबारी प्रयत्न करणार 

- नदीपात्रात जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब प्रक्रिया करूनच जाईल, याला सर्वोच्च  प्राधान्य देणार

- पुण्याच्या दीर्घकालीन हितासाठी थिंकटँक स्थापन करून नियमित संवाद साधणार

- देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून पुण्याला लौकिक मिळवून देणार

- ससून रुग्णालयात रुग्णांच्या सुविधेसाठी खासदार मदत कक्ष सुरू करणार

- पुण्यातील सार्वजनिक वाहतूक सक्षम आणि वेगवान बनविणार.

- नगर रस्ता, सातारा रस्ता, जुना मुंबई-पुणे रस्ता, सोलापूर रस्ता, शिवाजीनगर ते हिंजवडी, तसेच कोथरूड उपनगर या मार्गांवर विस्तारित मेट्रो मार्गांची आखणी व्हावी आणि हे मार्ग जलदगतीने पूर्ण व्हावेत, यासाठी पाठपुरावा करणार. 

- दौंड-पुणे-तळेगाव-लोणावळा ईएमयू, पुणे-दौंड लोकल सेवा आणि नाशिक-पुणे मार्गासाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करणार. 

- पुणे स्टेशन, शिवाजीनगर, खडकी, हडपसर स्टेशनचा आधुनिक पद्धतीने विकास करणार.

- लोहगाव, पुणे विमानतळाच्या धावपट्टीची लांबी वाढविणार. 

- ‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा’कडे (एनएचएआय) पुणे-नगर रस्त्यावर येरवडा ते शिक्रापूरदरम्यान सहा पदरी उड्डाणपुलाबाबत पाठपुरावा करणार.

- शहराचा वाढता परीघ, मोठ्या प्रमाणावर होणारे स्थलांतर आणि पायाभूत सुविधांवर येणारा ताण लक्षात घेता, पुण्याच्या चोहोबाजूंना नगररचना योजना (टीपी स्कीम) सुरू करणार.

- समान पाणीपुरवठा योजनेचे काम वेगाने पूर्ण करणार.

- पुण्यातील जुने तलाव, विहिरी, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करणार. 

- नवे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्ण करून पूर्ण क्षमतेने चालविणार.

- पुण्याभोवतालच्या टेकड्या, वनक्षेत्राचे कसोशीने संरक्षण करणार.

- ‘वेस्ट टू वेल्थ’च्या माध्यमातून कचऱ्यातून ऊर्जानिर्मिती, खत उत्पादन अशा पर्यावरणपूरक कार्यक्रमांची अंमलबजावणी करणार. 

- मराठीस अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी पाठपुरावा करणार. 

- कचरामुक्त पुण्यासाठी शहराच्या विविध भागांत प्लॉगेथॉन उपक्रम नियमित राबविणार, ई-कचरा व्यवस्थापन आणि पुनर्वापर प्रकल्प उभारणार.

- सोसायट्या, सार्वजनिक ठिकाणे, व्यावसायिक संकुले येथे सौरऊर्जा वापराला प्रोत्साहन देणार.

- ‘अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था’ (एम्स) पुण्यात उभारण्याच्या राज्य सरकारच्या घोषणेनुसार पूर्ततेसाठी पाठपुरावा करणार. 

- महापालिकेचे ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय’ पूर्ण क्षमतेने सुरू करणार, महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालय उभारणार.

- रुग्णांच्या नातेवाइकांकडून डॉक्टरांना होणाऱ्या त्रासापासून सुरक्षा मिळावी, याकडे विशेष लक्ष देणार.

- वेगाने विकसित होणाऱ्या स्टार्टअप इकोसिस्टीमला प्रोत्साहन देणार.

- ‘मुद्रा योजने’च्या माध्यमातून तरुणांना अर्थसाहाय्य मिळवून देणार. 

- सुधारित नियमावली वापरून ‘झोपडपट्टी पुनर्वसन योजने’अंतर्गत झोपडपट्टीधारकांना सदनिका देणार.

- रिक्षा सेवेसाठी शासकीय पातळीवर ॲप विकसित करणार.

- विविध कंपन्यांच्या ‘सीएसआर’ निधीतून तरुणांसाठी स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम राबविणार.

- श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे क्रीडा विद्यापीठाच्या उभारणीसाठी प्रयत्न करणार.

- विद्यार्थी व शिक्षण संस्थांना पुणे परिसरातील कंपन्या हॉस्पिटल, आयटी सेक्टरसह अन्य उद्योगांशी जोडणार.

- मुंबई ‘आयआयटी’चा सॅटेलाईट कॅम्पस पुण्यात येण्यासाठी पाठपुरावा करणार.

- पुण्यातील संशोधन संस्था आणि उद्योग यांना एकत्र आणून शहर विकास व रोजगार निर्मितीची मॉडेल्स आखण्यासाठी संवाददूताची भूमिका निभावणार. 

- संगमवाडी येथील आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या समाधीस्थळाच्या कामाला गती देणार.

- महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केलेल्या भिडे वाड्याचे स्मारक होण्यासाठी पाठपुरावा करणार.

- पुरातत्व खात्याच्या नियमांमुळे वारसास्थळांच्या परिसरातील बांधकामांत अडथळा येऊ नये यासाठी पाठपुरावा करून निश्चित धोरण आखणार. 

- पुणे व खडकी कॅन्टोन्मेंट पुणे महापालिकेत विलीन करणे व या परिसरातील ‘एफएसआय’ वाढविणे यासाठी पाठपुरावा करणार.  

- पुण्यातील गणेशोत्सव परंपरा आणि नवतेचा संगम साधत अधिक वैभवशाली होण्यासाठी विचारविनिमय करणार. 

- शहरातील जागांच्या योग्य आणि न्याय्य वापरासाठी धोरण आखणार.

- शहरात आपत्ती व्यवस्थापन मजबूत करणार.

- कमी वेळात खूप पाऊस होऊन पूरस्थिती उद्‌भवते. ती रोखण्यासाठी शहरी पूरनियंत्रण आराखडा तयार करणार.

- येत्या पाच वर्षांत प्रत्येक घरांत पाईपद्वारे गॅस पुरवठा करणार.

- ऐतिहासिक-धार्मिक स्थळांचे जतन, संवर्धन व सुशोभीकरण करणार.

- सर्वसामान्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी दर महिन्याला जनमंचाचे आयोजन करणार.

वर्षाचे ३६५ दिवस २४x७ उपलब्ध असणे, ही मी माझी जबाबदारी समजतो. माझ्या कार्यालयाचे दरवाजे पुणेकरांसाठी चोवीस तास खुले आहेत आणि असतील .

- मुरलीधर मोहोळ

जनतेचा जाहीरनामा

‘पुणे नेक्स्ट’ या व्यासपीठाच्या माध्यमातून आम्ही पुणेकरांना त्यांच्या अपेक्षा मांडण्यासाठी आवाहन केले होते. यातून हजारो सूचना आल्या. त्यातील काही निवडक सूचनांचा ‘संकल्पपत्रा’मध्ये समावेश केला आहे. यातील सूचना केंद्र, राज्य व स्थानिक स्वराज्य संस्था अशा वेगवेगळ्या संस्थांच्या अधिकारकक्षांत येतात. याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न त्या-त्या स्तरावर निश्चितपणे केला जाईल.   

-पुण्यातील प्रमुख रस्त्यांवर आठवड्यातून एकदा ‘नो व्हेईकल झोन’ उपक्रम राबवावा.

-काँक्रीट मिक्सर्स आणि जड वाहनांना मुख्य शहरात सकाळी ८.३० ते १०.३० आणि सायंकाळी ५.३० ते रात्री १० प्रवेश बंदी करावी. 

-महिन्यातील एक दिवस सार्वजनिक वाहने, इलेक्ट्रिक वाहने किंवा सायकलच्या वापरासाठी राखून ठेवावा. 

-प्रत्येक गृहनिर्माण सोसायटीने दर तीन महिन्यांतून एकदा वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवावा. टेकड्या, शाळा, सार्वजनिक आस्थापना येथील वृक्षसंवर्धनाची जबाबदारी उद्योग क्षेत्रे, बँका यांनी घ्यावी.

-सार्वजनिक उत्सवांमधील डीजेचा वापर थांबवावा.

-स्ट्रीट फूड्सची गुणवत्ता राखण्यासाठी सातत्याने तपासणी व्हावी.

-पाण्याची नासाडी रोखण्यासाठी गळणारे नळ, फुटक्या पाईपलाईन्स, गळते टँकर यांच्यावर अंकुश ठेवावा. 

-केंद्र व राज्य सरकारांच्या मोकळ्या जागांवर वनीकरण कार्यक्रम राबवावा.

-पाऊस येताच मोठ्या प्रमाणात ड्रेनेज तुंबतात आणि पाणी साचते. यासदंर्भात पावले उचलावीत.

-सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता प्राधान्याने आणि दर चार तासांनी व्हावी.

-वारसास्थळांच्या परिसरात ‘नो व्हेईकल झोन’ धोरण राबवावे.

-बेशिस्त वाहनचालक, बेशिस्त पार्किंगवर कारवाई व्हावी.

-रामवाडी मेट्रो विमानतळापर्यंत न्यावी.

...भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (ए), मनसे, रासप, लोकजनशक्ती महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा!

मतदान : सोमवार, दि. १३ मे २०२४ । सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत

प्रकाशक ः धीरज घाटे, साने गुरुजी नगर, पुणे ४११ ०३० | मुद्रक ः सद्‌गुरू ग्राफिक, पौड रोड, पुणे ४११ ०३८  |  प्रती ः १०,००० |  प्रसिद्धी दिनांक ः ८ मे २०२४


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती