सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 शहर

भोरमध्ये लागले एमआयडीसी संदर्भात होर्डिंग

डिजिटल पुणे    17-04-2024 11:29:01

भोरः तालुक्यात प्रत्येक निवडणुकीला तरुणांना एमआयडीसीचे शब्द दिला जातो आणि हाच अजेंडा प्रत्येक पक्षाचा लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती या प्रत्येक निवडणुकीला घेतला जातो परंतु आता भोर तालुक्यातील तरुणांचा सहनशीलतेचा मान फुटला असेल नको आता एमआयडीसीचा गाजर करूया आता बदलाचा जागर या आशयाचे पोस्टर्स आता भोर तालुक्यात विविध ठिकाणी लावण्यात आले आहेत.

तालुक्याच्या तरुणाच्या रोजगाराच्या प्रश्नावर प्रत्येक निवडणुकीत मताच्या राजकारणासाठी प्रत्येक पक्षाचा अजेंडा असतो भोर तालुक्यातील औद्योगीकरण आणि प्रत्येक वेळी निवडणुक झाली की औद्योगीकरणाचे गाजर दाखवण्याचे काम मात्र या पक्षांकडून केले जाते.विधानसभेची निवडणूक असो किंवा लोकसभेची निवडणूक असो निवडणुकीच्या वेळी भोर तालुक्यात सर्वच पक्षांच्या नेत्यांना आठवण येते ती म्हणजे भोरच्या एमआयडीसीची. भोरच्या एमआयडीसीचा मुद्दा घेऊन ऐन निवडणुकीच्या वेळी सर्वच पक्षीय नेते मंडळी आपली भाषणे गाजवत असतात.

भोर व राजगड तालुक्यात एमआयडीसी नसल्याने रोजंदारीचा गंभीर प्रश्न आहे. ही दोन्ही तालुके आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत. भोरच्या शेजारी खंडाळा एमआयडीसी आहे. भोरचा बरचसा तरुण वर्ग याठिकाणी पोटाची खळगी भरण्यासाठी जात आहे. या ठिकाणी जाण्यासाठी लांबपल्याचा प्रवास दुचाकीने करावा लागत असल्याने पेट्रोलचा खर्च परवडत नाही. परंतु परवडत नसतानाही नाइलाजास्तव तालुक्यात रोजगार उपलब्ध नसल्याने जावे लागत आहे.याच कारणावरून येत्या निवडणुकीत भोर औद्योगीकरण प्रश्न मार्गी लागावा यासाठी भोर तालुक्यात चौपाटी या ठिकाणी बेरोजगारीमुळे भोर सोडलेले भोरकर यांच्याकडून होल्डिंग लावण्यात आलेले आहेत. त्यामध्ये नको आता एमआयडीसी च गाजर करूयात आता बदलाचा जागर अश्या आशयाचे मजकूर देखील लावण्यात आलेला आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती