सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 पूर्ण तपशील

तुम्हाला माहितीये 'कुन बोकाटोर' याखेळा विषयी; नसेल तर नक्की वाचा 'कुन बोकाटोर' म्हणजे नक्की काय ?

पुजा    22-04-2024 14:17:35

पुणे : 'कुन बोकाटोर', हा शब्द ऐकताच हा कोणत्याही खेळाशी संबंधित असणार याचा अंदाज बांधता येत नाही. मुळात हा शब्द खमेर संप्रदायातील कंबोज या भाषामधील मार्शल आर्ट या स्वसंरक्षण कलेशी संबंधित आहे.

कुन-म्हणजे मार्शल आर्ट, तर बोकाटोर म्हणजे सिंहाप्रमाणे झडप घालणे होय.

मूळात भारतीय स्वसंरक्षण कला, परंतु विस्तार होऊन विश्वाने तिला स्वतःचे नाव दिले त्यापैकी एक राष्ट्र म्हणजे जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर असलेले (अंगकोर वॉट, विष्णू मंदिर) म्हणजेच कंबोडिया देश.

कुन बोकाटारे ही पूर्वीच्या काळी कंबोडीया मध्ये फक्त राजाचे अंगरक्षक (बॉडीगार्ड) आणि सेना प्रमुख यांनाच शिकण्याची परवानगी असायची. त्यामुळे ह्या कलेचा हवा तसा त्या ठिकाणी प्रचार प्रसार होऊ शकला नाही. याच गोष्टीचा फायदा घेऊन कंबोडीयाचे शेजार राष्ट्र मित्र थायलंड यांनी या कलेचा आणखी विकास करून त्या कलेस विविध नावाने जगासमोर मांडले. त्यामध्ये थायबॉक्सिंग, भुईथाई, भुईबोरान, भुई चाँय, भुई लोआस असे विविध प्रकारांमध्ये विभागणी करण्यात आली.

सदय स्थितीला कुन बोकाटोर कंबोडिया देशाची राष्ट्रीय युद्ध कला म्हणून प्रचलित असून कंबोडियाचे संरक्षण दलात सक्तीची करण्यात आली असून शालेय स्तरावर तसेच महाविद्यालयांमध्ये देखील सक्तीची करण्यात आली आहे.

भारतामध्ये याची सुरूवात २०१४ पासून प्रशिक्षक उमेश लोंढे यांच्या कडून सलग २०२४ पर्यंत चालवण्यात येत आहे. भारतीय अध्यक्ष म्हणून व कंबोडीचा कुन बोकाटोर महासंघाच्या नियमानुसार फक्त गृह विभाग, सैनिक, पोलीस यांनाच प्रतिनिधित्व संधी देण्यात असल्यामुळे अध्यक्षपदी वरिष्ट पोलीस रीक्षक राजेंद्र निकाळजे (ब्लॅकबेल्ट) यांची नियुक्ती करण्यात आली.

सॅन कीम सियान हे जागतिक कुन बोकाटोर महासंघाचे संस्थापक असून कला जिवंत ठेवण्यात खूप मोठा वाटा आहे. त्यांचा डॉ. चॅन सरून हे चेअरमन पदी असून माजी ऑलिंपियन आहेत तर सचिवपदी राष्ट्रीय कुन बोकाटारे विजेता डॉ. दारा ऑवर (अभिनेता) हे तर राष्ट्रीय प्रशिक्षक व्ही. वाय. तारा हे आंतरराष्ट्रीय समन्वयक आहेत.

मार्शल आर्ट प्रमाणेच यामध्ये देखील कराटेसारखे बेल्ट असतात परंतु कंबोजमध्ये त्याला स्काक म्हणतात, गणवेशदेखील वेगळा असून त्यास सांगवार म्हटले जाते. रैंक ही स्काफ वरून ओळखली जाते. ज्यामध्ये सर्वोच्च पदवी गोल्ड क्रॉमा म्हणजेच गोल्डन बेल्ट म्हणजेच मास्टर ब्लु क्रॉमा, रेड क्रॉमा, ब्लॅक क्रॉमा, ब्राऊन क्रॉमा असे रंग असून त्यानुसार त्याचा अभ्यासक्रम असून त्यामधील पदवी करीताचा कार्यक्रम हा ३ वर्षांचा असतो. डॉ. सॅन कीम सियान हेच फक्त गोल्ड क्रॉमा असून जागतिक स्तरावर याचे नियंत्रण करीत आहेत.

कुन बोकाटोर खेळ हा युनेस्कोच्या यादीत वर्ल्ड हेरीटेज, तसेच ऑलिंपीक कौन्सिल ऑफ एशिया व सी ऑलिंपीक गेम्स यात नॅशनल ऑलिंपिक कमिटी ऑफ कंबोडिया यांच्या यादीत हा खेळ असून सध्या जगात लोकप्रिय होत आहे. 

एकूण १२ प्रकारांमध्ये हा खेळ खेळला जातो त्यामध्ये One-man Performance, Perform Group, Stof & Bow, Fight, Shadow Fight, 1 Man to 2 Man Fight, 1 Woman to 2 Woman Fight अशा प्रकारांमध्ये तसेच शस्त्रांचे प्रदर्शन, शस्त्र स्पर्धा अशांमध्ये या खेळाला खेळले जाते. पुर्वी नव्हते परंतु आता सर्व स्वसंरक्षण कीट सेफ्टी गार्डसहीत असल्याने त्याला विविध स्तरांवर मान्यता मिळत आहेत.

उमेश लोंढे हे गली अनेक वर्षे या खेळावर संशोधन व अभ्यास करीत असल्याने एकमेव भारतीय प्रतिनिधी असल्याने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना आंतरराष्ट्रीय समितीने सदस्य म्हणून व समन्वयक आशिया म्हणून नियुक्त केले आहे. यांच्याद्वारे, ईरान ईराक, युएस, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, उझबेकिस्तान असे राष्ट्रामध्ये हा खेळ पोहोचवण्यात आला आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती